काँग्रेसमध्ये प्रथमच तृथीयपंथीयांकरिता स्वतंत्र सेल, अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांनी नियुक्ती
By रेश्मा शिवडेकर | Published: January 10, 2024 05:19 PM2024-01-10T17:19:53+5:302024-01-10T17:20:11+5:30
Mumbai Congress News: मुंबईतील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर काम करण्याकरिता मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीने (एमआरसीसी) प्रथमच स्वतंत्र सेलची निर्मिती केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
- रेश्मा शिवडेकर
मुंबई - मुंबईतील तृतीयपंथीयांच्या विविध समस्यांवर काम करण्याकरिता मुंबई प्रादेशिक काँग्रेस समितीने (एमआरसीसी) प्रथमच स्वतंत्र सेलची निर्मिती केली आहे. या सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.
एमआरसीसीच्या अध्यक्ष प्रा-आमदार वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ट्रान्सजेंडर कम्युनिटी सेलच्या अध्यक्षपदी सलमा उमरखान साखरकर यांची नियुक्ती केली. मुंबईत प्रथमच एखाद्या राजकीय पक्षाने तृतीयपंथींकरिता स्वतंत्र सेलची निर्मिती केल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच नियुक्ती आहे. "काँग्रेस नेहमीच रूढी आणि पुरोगामी विचारांना तोडण्यात आघाडीवर राहिली आहे. आमचा विचार सर्व प्रकारच्या समुदायांना सामावून घेण्याचा असतो. या सेलमुळे तृतीयपंथीयांना आपली बाजू, समस्या, मते मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.