'भाजपाचे माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात; येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:02 PM2020-02-07T12:02:57+5:302020-02-07T12:05:25+5:30
विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापन होऊन ३ महिन्याचा कालावधी होत असताना पुन्हा एकदा भाजपाकडून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर राज्य सरकार जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता आहे असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मात्र भाजपाचे अनेक माजी मंत्री महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं दावा मंत्रीनवाब मलिक यांनी केला आहे.
याबाबत टीव्ही ९ शी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, भाजपाची लाट ओसरली असून त्यांच्यातील अनेक माजी मंत्री राष्ट्रवादी, शिवसेनेत येण्यात इच्छुक आहेत. येत्या आठवडाभरात मोठे फेरबदल झाल्याचा पाहायला मिळतील असा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तापालट होईल अशी बातमी पेरली जात आहे. महाराष्ट्राचे नेते दिल्लीत प्रचार करत आहे मात्र त्यांची बोट महाराष्ट्रातच बुडणार असं नवाब मलिकांनी सांगितले आहे.
...तर राज्यात मध्यावधी निवडणुका होणार, चंद्रकांत पाटलांचे भाकीत
विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी अनेक काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र यातील काही नेते पुन्हा घरवापसीचा विचार करत आहेत. तसेच पक्षासाठी इतकी मेहनत घेऊनही आपल्यावर अन्याय झाला अशी भावना असणारे नेतेही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहे असं सांगत नवाब मलिकांनी भाजपामधील नाराजांकडे बोट दाखवलं.
मराठा आरक्षण देण्यास सरकारमधील काही जणांचा विरोध; भाजपाचा गंभीर आरोप
भाजपाची लाट ओसरली आहे. लोकांचा भाजपावरुन विश्वास उडाला आहे. भाजपाचे अनेक नेते आणि माजी मंत्री महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. येत्या आठवडाभरात हे भाजपाला समजेल असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.
हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा
दरम्यान, शिवसेनेवर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, 'लोकांना माहिती आहे कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे लोक ठरवतील असं सांगत राज्यात या वर्षाअखेरीस मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत दिले.