कारणे दाखवा नोटिशीनंतर काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 07:27 AM2023-08-28T07:27:17+5:302023-08-28T07:27:33+5:30
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (९ ऑगस्ट ) मुंबई काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसमधील काही पदाधिकारी, तसेच नेते अनुपस्थित होते.
मुंबई : ऑगस्ट क्रांती दिनी बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, याचा विपरीत परिणाम काँग्रेस लोकप्रतिनिधींवर झाला असून, पक्षाने कारण विचारले म्हणून काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी थेट राजीनामे दिले आहेत.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (९ ऑगस्ट ) मुंबई काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसमधील काही पदाधिकारी, तसेच नेते अनुपस्थित होते. याबद्दल त्यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या नोटिशीनंतर पक्षातील नेत्यांमधील नाराजी अधिकच तीव्र झाली होती. याचाच परिणाम म्हणून आता मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामा दिले आहेत, तर पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनीदेखील राजीनामा दिला आहे. नवनियुक्त मुंबई काॅँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीविषयी या माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.