Ganesh Chaturthi 2018: 'फळीवर वंदना नव्हे फणीवर बंधना', गणपतीच्या आरतीत होणाऱ्या 'या' चुका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 05:47 PM2018-09-16T17:47:35+5:302018-09-16T17:48:47+5:30

Ganesh Chaturthi 2018 : गणपती बाप्पांची आरती म्हणताना आपणाकडून नेहमीच गल्लत होते. आरती म्हणताना अनावधानाने आपण काही चुका करतो, ज्यामुळे आरतीचा अर्थच बदलतो.

Ganesh Chaturthi 2018: 'Not to be confused', do not do 'mistakes' that happen in the Ganapati Arati | Ganesh Chaturthi 2018: 'फळीवर वंदना नव्हे फणीवर बंधना', गणपतीच्या आरतीत होणाऱ्या 'या' चुका टाळा

Ganesh Chaturthi 2018: 'फळीवर वंदना नव्हे फणीवर बंधना', गणपतीच्या आरतीत होणाऱ्या 'या' चुका टाळा

googlenewsNext

मुंबई - घरोघरी बाप्पांचे आगमन झाले असून गणेश मंडळातही गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. शनिवारी गौर गणपतीसह बाप्पांची आरती करण्यात आली. मात्र, आरती करताना नेहमीच उपस्थित भक्तांकडून अनावधानाने काही चुका होतात. त्यानंतर या चुका हास्याचा विषय बनतात. मात्र, आपण या चुका टाळायला हव्यात. तर, दहा दिवस नियमितपणे बाप्पांची आरती चुकांशिवाय म्हणावी.

गणपती बाप्पांची आरती म्हणताना आपणाकडून नेहमीच गल्लत होते. आरती म्हणताना अनावधानाने आपण काही चुका करतो, ज्यामुळे आरतीचा अर्थच बदलतो. जसे की आपण 'संकटी' पावावेऐवजी 'संकष्टी' पावावे असे म्हणतो. तसेच वाट पाहे 'सदना' ऐवेजी 'सजना' हा शब्द आपल्याकडून उच्चारला जातो.

चुकीचा उच्चार             योग्य उच्चार
फळीवर वंदना            फणीवर बंधना
संकष्टी पावावे            संकटी पावावे
वाट पाहे सजना             वाट पाहे सदना
निरमा निरक्षावे             निर्वाणी रक्षावे            

''गणपतीची आरती''
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
 
जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव...
 
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा।
हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥ जय देव...
 
लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।
दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना॥ जय देव...।

Web Title: Ganesh Chaturthi 2018: 'Not to be confused', do not do 'mistakes' that happen in the Ganapati Arati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.