झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:24 AM2023-09-02T04:24:20+5:302023-09-02T04:25:49+5:30

‘यह फेविकाॅल का जोड है, टुटेगा नही’ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळी लोकसभेच्या सर्व  जागा जिंकण्याचा निर्धार केला. 

Ganga got it, why add Fevicol now! | झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

झालं गेलं गंगेला मिळालं, आता फेविकॉल का जोड!

googlenewsNext

मुंबई : महापालिका, विधानसभा, लोकसभेवेळी कोणी काय केले, याचा हिशेब काढून उगाळत बसण्यापेक्षा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचे लक्ष्य समोर ठेवा, उमेदवार कोण वगैरे चर्चेत पडू नका, सगळीकडे आपले उमेदवार मोदीच आहेत. ‘यह फेविकाॅल का जोड है, टुटेगा नही’ असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या बैठकीत व्यक्त केला. यावेळी लोकसभेच्या सर्व  जागा जिंकण्याचा निर्धार केला. 

हयातभर भ्रष्टाचार
इंडियावाले दोन दिवस मुंबईत आले. खोटे आरोप केले. हयातभर भ्रष्टाचार करणारे आज हयातमध्ये जमले होते. हवा, अहंकार अन् ध्वनीचे प्रदूषण मुंबईत दोन दिवस जरा जास्तच होते.
    - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

अजित पवार म्हणाले...
मागच्या निवडणुकांत काय घडले ते, झालं गेलं गंगेला मिळालं. राज्याला उभारी द्यायची आहे, मोदींचे हात बळकट करायचे आहेत. चांदा ते बांदा सगळ्या जागा निवडून आणायच्या आहेत. महायुतीमध्ये आम्ही कोणावरही अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेवू. राजकारणातील अस्पृश्यता संपवून विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे एकमेकांविरुद्ध अनावश्यक टीका-टिप्पणी टाळा. 

इंडि(या)ची भेंडी झाली...
ममता बॅनर्जी जागा मिळत नाही म्हणून इंडियाच्या बैठकीतून निघून गेल्या. पवार साहेबांनी त्यांना थांबवले, पण उपयोग झाला नाही. इंडि(या)आघाडीची तर भेंडी झाली आहे. ‘आगामी निवडणूक शक्यतो एकत्रित लढू’ असे या आघाडीचे ठरले. त्यांचा नेताही ठरत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
 

Web Title: Ganga got it, why add Fevicol now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.