वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानास मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 08:45 PM2020-01-15T20:45:46+5:302020-01-15T20:46:49+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेतली होती.

Government approves Rs 24 crore grant for Wadia Hospital - Rajesh Tope | वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानास मान्यता

वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून 24 कोटी रुपये अनुदानास मान्यता

Next

मुंबई: वाडिया मॅटर्नीटी रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार  हे अनुदान वाडिया रुग्णालयास उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी यासंदर्भात बैठक घेतली होती. बैठकीत वाडिया रुग्णालयास आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आरोग्यमंत्र्यानी कालच विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुदान वितरित करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार आज सायंकाळी वित्त विभागाने त्याबाबतचे मंजुरी आदेश निर्गमित केले

Web Title: Government approves Rs 24 crore grant for Wadia Hospital - Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.