जीएसटी भवनची आग लागली की लावली?; काँग्रेस नेत्याकडून एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 04:15 PM2020-02-18T16:15:07+5:302020-02-18T16:25:02+5:30

आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न काँग्रेस नेते आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राज यांनी उपस्थित केला आहे.

The GST office fire should be inquired through SIT Demand for Congress leaders | जीएसटी भवनची आग लागली की लावली?; काँग्रेस नेत्याकडून एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

जीएसटी भवनची आग लागली की लावली?; काँग्रेस नेत्याकडून एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

Next

मुंबई : माझगावच्या जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागून वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, फर्निचर, फाइल्स, नोंदी इत्यादी जळून खाक झाल्याची घटना समोर आली होती. तर ही आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न काँग्रेस नेते आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राज यांनी उपस्थित केला आहे.

रवी राज म्हणाले की, जीएसटीचा टॅक्सची वसुली यावर्षी कमी आहे. तर याप्रकरणी काही लोकोंची चौकशी सुरु आहे. याचवेळी अशी आग लागते आणि सर्व दस्तऐवज यात नष्ट होतात. त्यामुळे याचा फयदा कुणाला होणार आहे ? यावरून संशय निर्माण होत असून, याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

तर जिथे आयुक्त बसतात तिथेच आग कशी काय लागू शकते? तसंच ह्यामुळे मुंबई शहरांत अग्निशामन दलाची कमतरता आहे. शहराच्या लोकसंख्येनुसार अग्निशामक केंद्र अपुरी आहेत, ह्यावर विचार व्हायला हवा. तसेच गेल्या आठवड्याभरात मुंबईत आगीच्या घटना वाढल्या आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने आपले कर्तव्य गंभीरपणे बजावले पाहिजे, असेही ते म्हणाले.


 

 

Web Title: The GST office fire should be inquired through SIT Demand for Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.