Balasaheb Thorat: .... तर सत्यजीत तांबे यांच्याबाबतीत 'ती' चूक होऊच दिली नसती; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:44 PM2023-02-14T13:44:13+5:302023-02-14T13:49:17+5:30
गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला.
गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्येसत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. आता या गोंधळावर खुद्द बाळासाहेब थोरात यांनी एका कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले आहे.
'मी मध्ये काँग्रेस श्रेष्ठींना एक पत्र लिहिले त्यात मी निवडणुकी काळात जे घडल त्यात मी सर्व सांगितले. विधान परिषद निवडणुकीत मी आजारी असल्यामुळे सक्रीय नव्हतो. मी असतो तर सत्यजीत तांबेबाबत जी टेक्निकल चूक झाली ती चूक मी होऊ दिलीच नसती. या संदर्भात काँग्रेसच्या हायकमांडने दखल घेतली. काल काँग्रेच्या एच के पाटील यांनी एक बैठक घेतली आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चांवरही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले.'आपला विचार हा काँग्रेसचा विचार आहे, वेगळा विचार असू शकत नाही. या बाबतीत कोणतीही तडजोड नाही, असंही काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
पक्षांतर्गत गोष्टी आहेत त्या पक्षाच्या नेत्यांसोबत बसून सोडवल्या पाहिजेत. काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असंही थोरात म्हणाले.
नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासूनच काँग्रेसमधील अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधानसभेतील गटनेतेपदाचा राजानामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यानंतर काल काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
रायपूर अधिवेशनाला जाणार
मागील अनेक दिवसांपासून मी माध्यमांसमोर आलेलो नाही. माझा राजीनामा हा काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. माध्यमांनी त्याला खूप मोठे केले. माझी आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी काँग्रेसच्या रायपूरमधील अधिवेशनाला यावे, असा आग्रह केला आहे. मी या अधिवेशनाला जाणार आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.