हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार - अंकितानं बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:57 AM2021-12-29T11:57:11+5:302021-12-29T11:58:10+5:30

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांच्यासोबत पार पडला.

Harshvardhan Patils daughter ankita got married with balasaheb thackeray grandson nihar in mumbai taj palace | हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार - अंकितानं बांधली लगीनगाठ

हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार - अंकितानं बांधली लगीनगाठ

googlenewsNext

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे सुपुत्र निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत नुकताच पार पडला. मुंबईतील ताज पॅलेस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला असून अनेक बड्या नेतेही या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या विवाहसोहळ्याची चर्चा सुरू होती. 

निहार यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण पूर्ण झालं असून ते पेशाने वकील आहेत. तर अंकिता पाटील पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. अंकिता यांनी लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतलं असून १ वर्ष त्या हार्वर्डमध्ये शिकण्यास होत्या. याचवेळी निहार हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत होते. याच ठिकाणी दोघांची ओळख झाली.

नुकताच राजकारणात प्रवेश
अंकिता पाटील यांनी अलीकडेच राजकारणात प्रवेश केला असून बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. हर्षवर्धन पाटील हे भाजपत असले तरी त्यांच्या कन्या अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. अंकिता पाटील यांचे शिक्षण परदेशात झाले आहे. शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी शैक्षणिक कार्य त्यांनी सुरू केले होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या त्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नप्रभादेवी पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बावडा-लाखेवाडी गटातील निवडणुकीत त्या विजयी झाल्या

कोण आहे निहार ठाकरे?
निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे हे निहार ठाकरे यांचे सख्खे काका तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चुलत काका आहेत.

Web Title: Harshvardhan Patils daughter ankita got married with balasaheb thackeray grandson nihar in mumbai taj palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.