चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 12:04 PM2024-11-20T12:04:02+5:302024-11-20T12:07:50+5:30
याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती.
मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने सिरियस फ्रॉड इन्वेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ) ला दिले. तसेच चंदा कोचर यांची चौकशी कार्यालयीन वेळेतच व्हावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले.
ज्येष्ठ नागरिकांची चौकशी कार्यालयीन वेळेतच करावी, असे निर्देश एसएफआयओला द्यावेत, अशी मागणी चंदा कोचर यांनी याचिकेद्वारे केली.
या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे होती.
एसएफआयओने २२ नोव्हेंबर रोजी चौकशीला हजर राहण्याकरिता समन्स बजावल्याने कोचर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तीन वर्षांनंतर एसएफआयओने समन्स बजावले असल्याचे कोचर यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले.