हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 08:57 PM2020-07-20T20:57:03+5:302020-07-20T20:58:46+5:30

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता.

High court judges will get Rs 50,000 every year for buying spectacles | हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

googlenewsNext

मुंबई - राजधानी मुंबईतीलउच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाकडील मुंजरी प्राप्त प्रस्तावानुसार, न्यायाधीश महोदयांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांनाही या आदेशानुसार लाभ घेता येणार आह. याप्रकरणी मुख्य सचिव आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात 5 ते 6 महिन्यांपूर्वी चर्चा झाली होती. 

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता. संयुक्त सचिव योगेश आमेटा यांच्या सहीने शासन आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीशास चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 


 

Web Title: High court judges will get Rs 50,000 every year for buying spectacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.