घडी विस्कटलेल्या काँग्रेससमोर पालिकेतील सन्मानाचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:50 AM2020-11-21T01:50:31+5:302020-11-21T01:50:39+5:30

अंतर्गत गटबाजी आणि त्यातील तीव्र संघर्ष, ही मुंबई काँग्रेसची नेहमीची डोकेदुखी आहे. त्यातूनच अनेकदा मुंबई अध्यक्ष पदाचा वाद विकोपाला पोहचतो.

The honor of the municipality is bitter in front of the Congress which has been shaken for a long time | घडी विस्कटलेल्या काँग्रेससमोर पालिकेतील सन्मानाचा तिढा

घडी विस्कटलेल्या काँग्रेससमोर पालिकेतील सन्मानाचा तिढा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीचा प्रयोग राबवायचा यावरून काँग्रेसमधील संभ्रम गुरूवारी उघड झाले. मुंबईतील निवडणुका स्वबळावरच लढण्याच्या अनेक स्थानिन नेत्यांचा आग्रह आहे. तर, दुसरीकडे महाआघाडीचा प्रयोग करण्याचा सूरही काही नेते लावत आहेत. मात्र, सन्मानजनक जागावाटप झाले तरी स्थानिक राजकारण धोक्यात तर येणार नाही ना, अशी चिंता मुंबईतील कॉंग्रेसजनांसमोर उभी झाली आहे.


अंतर्गत गटबाजी आणि त्यातील तीव्र संघर्ष, ही मुंबई काँग्रेसची नेहमीची डोकेदुखी आहे. त्यातूनच अनेकदा मुंबई अध्यक्ष पदाचा वाद विकोपाला पोहचतो. सध्या एकनाथ गायकवाड यांच्याकडे अध्यक्ष पद आहे. नव्या अध्यक्षाचा शोध सुरू आहे. त्यासाठी प्रदेश प्रभारी एच.के.पाटील बैठका आणि गाठीभेटीही घेत आहेत. काही नावे पुढे येत असली तरी अंतिम निर्णय कधी होणार, याबाबत कोणतीच स्पष्टता नाही. पालिकेत विरोधी बाकावर असलेल्या काँग्र्रससमोर सध्या पक्षाची संघटनात्मक घडी बसविण्याचे मोठे आव्हान आहे. हाच तिढा अद्याप सुटलेला नसताना पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढायच्या की महाविकास आघाडीत या नव्या प्रश्नाची भर पडली आहे.

याबाबतची भूमिकाही अध्यक्ष पदासाठी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.   कॉंग्रेसने महापालिका निवडणुका स्वतंत्रपणेच लढवायल्या हव्यात, पक्षाची तशी क्षमता असल्याची भावना बहुसंख्य नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रभारी  एच.के. पाटील यांच्यासमोर मांडल्याचे कॉंग्रेस नेते रवी राजा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रवी राजा यांनी स्वबळाचा सूर आवळताच मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी तातडीने खुलासा करत ‘ते‘ रवी राजा यांचे वैयक्ति मत असल्याचे सांगून टाकले. सध्या आम्ही महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे आघाडीतच निवडणुका लढविण्याचा आमची भूमिका आहे. 


... तर एकत्र निवडणुका
काँग्रेसला सन्मानजनक जागा दिल्यास एकत्र निवडणुका लढविण्याचे संकेत एकनाथ गायकवाड यांनी दिले. त्यामुळे  भविष्यात तीन पक्षांच्या आघाडीत किती जागा मिळाल्या तर त्याला सन्मानजनक म्हणायचे, या प्रश्नावर काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर येत राहणार, अशी शक्यता आहे. 

Web Title: The honor of the municipality is bitter in front of the Congress which has been shaken for a long time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.