"१९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट मोदींच्या १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 07:49 PM2023-04-04T19:49:18+5:302023-04-04T19:51:01+5:30

जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल?

"How about a font developed in 1992 on PM Modi's 1983 certificate?", congress questioned | "१९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट मोदींच्या १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?"

"१९९२ साली डेव्हलप झालेला फॉन्ट मोदींच्या १९८३ च्या प्रमाणपत्रावर कसा?"

googlenewsNext

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह महाविकास आघाडीतील ठाकरे गटानेही पदवीवरुन मोदींवर निशाणा साधला आहे. मुळात पदवी विचारल्यावर यात लपवण्यासारखं काय आहे? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे. 'मोदींची 'उगाच' बदनामी' या मथळ्याखाली शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. "देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीचा वाद उकरुन काढला आहे. त्यावरुन, काँग्रेसनंही भाजपला घेरलं आहे. आता, महाराष्ट्र काँग्रेसने पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला.  

जे पंतप्रधान स्वतःचे 'शिक्षण' लपवत आहेत, त्यांची 'उगाच' बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे, असं म्हणत मोदींच्या पदवीवरुन शिवसेनं टोला लगावला होता. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी डिग्रीवरुन वाद बिनकामाचा आहे, तो देशासमोरील प्रश्न नाही, असे म्हणत डिग्री प्रमाणपत्राच्या वादाला फटकारले आहे. मात्र, काँग्रेसकडून पुन्हा एकदा ट्विट करत, मोदींची डिग्रीच काय तर मोदी हा माणूसच बनावट असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत, मोदींच्या डिग्रीवरील फॉन्टवरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  

''डिग्री काय, मोदी हा माणूसच फेक (बनावट) आहे, असं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये महाराष्ट्र काँग्रेसने नरेंद्र मोदी यांच्या पदवीचा फोटो ट्वीट केला आहे. संबंधित पदवीत वापरलेला फॉन्ट हा १९९२ साली तयार करण्यात आला. मात्र, हा फॉन्ट पंतप्रधान मोदी यांच्या १९८३ सालच्या प्रमाणपत्रावर कसा काय? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. त्यामुळे, मोदींच्या पदवी प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

अजित पवारांनी फटकारलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून मोठा वाद उफाळून आला आहे. मोदींच्या कथित फेक डिग्रीवरून विरोधक टीका करत आहेत. याबाबत भाष्य करत अजित पवारांनी मोदींचं समर्थन केलं आहे. राजकारणात येण्यासाठी कुठल्याही पदवीची गरज नाही. त्यामुळे, कोणीही राजकारणात येऊ शकतो. लोकांच्या मतांच्या जोरावर येथे काम करता येते. येथे डिग्रीपेक्षा बहुमताला अधिक महत्व असल्याचं अजित पवार यांनी म्हटले. तसेच, मोदींच्या डिग्रीच्या वादावरुन त्यांनी एकप्रकारे वाद घालणाऱ्यांना फटाकारलं आहे. 

Web Title: "How about a font developed in 1992 on PM Modi's 1983 certificate?", congress questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.