Sugarfree Modak: गणपतीत आता बिनसाखरेचा मोदक बिनधास्त खाता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:09 AM2018-09-12T02:09:57+5:302018-09-12T02:10:16+5:30

ऐन सणासुदीच्या दिवसांतही मोदक, गुलाबजाम, बर्फी, श्रीखंड यांसारख्या गोडधोड पदार्थांच्या चवीला मुकणाऱ्यांसाठी यंदाच्या गणेशोत्सवात शुभवार्ता आहे.

How To Make Sugar Free Modak For Ganesh Festival Naivaidya | Sugarfree Modak: गणपतीत आता बिनसाखरेचा मोदक बिनधास्त खाता येणार

Sugarfree Modak: गणपतीत आता बिनसाखरेचा मोदक बिनधास्त खाता येणार

googlenewsNext

मुंबई : मधुमेह, अतिस्थूलता किंवा इतर जीवनशैलीजन्य आजारांमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांतही मोदक, गुलाबजाम, बर्फी, श्रीखंड यांसारख्या गोडधोड पदार्थांच्या चवीला मुकणाऱ्यांसाठी यंदाच्या गणेशोत्सवात शुभवार्ता आहे. यशोधन देशमुख या मराठमोळ्या बल्लवाचार्य आणि आहार संशोधकाने मिठाईतील साखरेचे-कर्बोदकांचे प्रमाण निम्म्याहून खाली आणून त्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.
बाहेर शुगर फ्री म्हणून जे पदार्थ विकले जातात, त्यात प्रत्यक्षात आर्टिफिशियल स्वीटनर असतात. त्यामुळे कॅन्सरजनक आजार जडू शकतात, असे सांगत शेफ व फूड संशोधक, विलेपार्ल्यातील मिठाईचे व्यापारी यशोधन देशमुख म्हणाले की, मधुमेहतज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली याकरिता काम सुरू केले. मुळातच साखर ही जशी उसापासून बनते, तसेच निसर्गातील इतर फळा-फुलांपासूनही बनवता येते. वनस्पतींमधील याच नैसर्गिक गोडव्याचा वापर करून नॅचरल स्वीटनर ब्लेंड केला आणि या नॅचरली ब्लेंडेड स्वीटनरचा उपयोग या मिठायांसाठी केला. या मिठायांची चव ही नेहमीच्या मिठायांसारखीच लागते. पण साखरेच्या दुष्परिणामाशिवाय हे विशेष खाद्यपदार्थातील विविध पोषणमूल्यांचे प्रमाण निर्धारित करण्यासाठी तसेच त्यासाठीची मानके निश्चित करण्यासाठी आपल्या देशात नॅशनल एक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग एंड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज ही सर्वोच्च शासकीय संस्था आहे. या संस्थेने मान्यता दिलेल्या आरसीए लॅबकडून आम्ही आमच्या मिठाईतील घटकांचे प्रमाण तपासून घेतले आणि त्यानंतरच ते खवय्यांना उपलब्ध करून दिले, असेही देशमुख यांनी सांगितले.
>फ्रोजन उकडीचे मोदक
शुगरफ्री मिठाईप्रमाणे खास गणेशोत्सवासाठी यशोधन देशमुख यांनी शुगरफ्री उकडीचे मोदकसुद्धा बनवले आहेत. हे मोदक चवीला अगदी घरच्या मोदकांप्रमाणेच लागत असले तरी ते बनवताना साखर किंवा गुळाचा अजिबात वापर केलेला नाही. विशेष म्हणजे, हे फ्रोजन मोदक हवे तेव्हा वाफेवर ठेवून गरमागरम खाता येणे शक्य आहे. हे मोदक फ्रीजमध्ये एक महिनाभर जसेच्या तसे राहतात.
सर्वसाधारण उकडीचा मोदक शुगरफ्री मोदक
प्रोटीन २ ग्रॅम ५ ग्रॅम
कर्बोदके ४० ग्रॅम ८ ग्रॅम
शर्करा ३५ ग्रॅम ५ ग्रॅम
गुलाबजाम
आपण जो सर्वसाधारण आकाराचा गुलाबजाम खातो, त्यात साधारणपणे १७० कॅलरी असतात, तर प्रोटीन नगण्य असतात. आम्ही बनवलेल्या गुलाबजाममध्ये फक्त ५० कॅलरी, तर तीन ग्रॅम प्रोटीन कंटेंट आहे.
श्रीखंड
नेहमीच्या १०० ग्रॅम श्रीखंडात ४८० हून अधिक कॅलरी आणि जेमतेम ५ ग्रॅम प्रोटीन असतात, या श्रीखंडातील कॅलरी २०० पर्यंत खाली आणल्या आणि त्यातील प्रोटीन कंटेंट ११ ग्रॅमपर्यंत वाढवला.

Web Title: How To Make Sugar Free Modak For Ganesh Festival Naivaidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.