मला गृहमंत्रिपद हवं होतं, वरिष्ठांना अनेकवेळा बोललो; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:33 PM2022-09-23T16:33:06+5:302022-09-23T16:41:02+5:30

काल पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषणात गृहमंत्रिपदावरुन फटकेबाजी केली, त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.   

I wanted Home Ministership, spoke to seniors several times says ncp leader Ajit Pawar | मला गृहमंत्रिपद हवं होतं, वरिष्ठांना अनेकवेळा बोललो; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

मला गृहमंत्रिपद हवं होतं, वरिष्ठांना अनेकवेळा बोललो; अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा

googlenewsNext

मुंबई :राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्पष्ट वक्तेपणामुळे नेहमी चर्चेत असतात. विरोधकांवर तसेच पक्षातील नेत्यांवर बोलत असतावना ते तोंडावर बोलत असतात. ते पोटात एक आणि ओठात एक ठेवत नाहीत असं बोललं जातं. काल पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी भाषणात गृहमंत्रिपदावरुन फटकेबाजी केली, त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.   

''महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना मी कित्येकवेळा गृह खातं मागितले होतं, पण वरिष्ठांनी काही ऐकलं नाही. त्यांना वाटत असेल मला गृहमंत्रिपद दिलं तर हा आपल काही ऐकणार नाही' असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.    

'तिकडे आघाडी करण्याची गरजच नाही'; आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा गृह खात्यावरुन खदखद व्यक्त करुन दाखवली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अनिल देशमुख यांना हे पद देण्यात आले. देशमुखांच पद गेल्यानंतर मी पुन्हा मागितले तरीही गृहखात दिले नाही. वरिष्ठांच ऐकाव लागत, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.   

आगामी निवडणुकांबाबत अजित पवारांचं मोठं विधान

राज्यात काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. एका बाजूला महाविकास आघाडी निवडणुका एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर एक मोठं विधान केले आहे.

साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी संदर्भात विधान केले. 'काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. यावेळी तुम्ही आम्हाला विचारत बसू नका कोणाशी आघाडी होणार आहे, तुम्ही स्वतंत्र लढायचे समजून तयारीला लागा, अशा सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिले. 

आघाडीचा निर्णय राज्यपातळीवर होईल. आपण १९९९ नंतर निवडणुका राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर लढवल्या आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पक्षाची ताकद जास्त आहे, त्या ठिकाणी आपण पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढल्या आहेत, असंही अजित पवार म्हणाले.      
 
 यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की वेगळ लढणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी महाविकास आघाडी येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्र लढणार असल्याची चर्चा होती.    

Web Title: I wanted Home Ministership, spoke to seniors several times says ncp leader Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.