'मी समाजवादी सोडून...' राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 15:18 IST2024-04-23T15:12:24+5:302024-04-23T15:18:13+5:30
Abu Azmi : काल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

'मी समाजवादी सोडून...' राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
Abu Azmi ( Marathi News ) : काल समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी रात्री उशीरा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता यावर स्वत: अबू आझमी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
भाऊ म्हणून मी पार्थच्या पराभवाचा बदल घेणार; मावळमध्ये रोहित पवारांनी अजितदादांना डिवचलं!
"मला राष्ट्रवादीत जायचे असते तर पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतं, मी १९९५ पासून पक्षात काम करत आहे. आमचा समाजवादी पक्ष राज्यात कमी आहे माहित आहे, पण मी एक सिद्धांतवाला व्यक्ती आहे. सत्तेच्या मागे नाहीतर बरोबर आहे तिकडे असतो. देशाच्या संविधानाबरोबर मी आहे. जायचं असतं तर मी आधीच सांगितलं असतं, असंही आझमी म्हणाले.
" मी देवेंद्र फडणवीस यांना भेटतो, अजित पवार यांनाही भेटतो. मी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गेलो होतो एका कामासाठी गेलो होतो. दिवसाच गेलो होतो. लपून छपून गेलो नव्हतो, असंही अबू आझमी म्हणाले.