नारायण राणेंना अंतरिम दिलासा, मुंबई पोलिसांना हायकोर्टाने दिले निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 12:18 PM2022-04-22T12:18:29+5:302022-04-22T12:19:12+5:30
Narayan Rane Gets relief From High court : दोन आठवडे कोणतेही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान महाड येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर राणे यांच्याविरोधात महाड, नाशिक, औरंगाबाद, पुणेसह विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. राणे यांना अटक झाल्यानंतर त्यांना महाड येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, जामीन मंजूर करताना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजेरी लावावी, अशी अट न्यायालयाने घातली होती. मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अंतरिम दिलासा हायकोर्टाने दिला असून दोन आठवडे कोणतेही कठोर कारवाई न करण्याचे पोलिसांना हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.