सिंचन घोटाळा प्रकरण : निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:29 AM2018-11-28T11:29:11+5:302018-11-28T11:32:46+5:30

Irrigation Scam : सिंचन घोटाळासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिज्ञापत्र सादर करुन भाजपाकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. 

Irrigation Scam : BJP Government harassing in the face elections, Chhagan Bhujbal's allegations | सिंचन घोटाळा प्रकरण : निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा आरोप

सिंचन घोटाळा प्रकरण : निवडणुकीच्या तोंडावर त्रास देण्याचा प्रयत्न, छगन भुजबळांचा आरोप

Next
ठळक मुद्देसिंचन घोटाळा :ऐन निवडणुकीच्या वेळी त्रास देण्याचा प्रयत्न - भुजबळप्रतिज्ञापत्र सादर करुन त्रास देण्याचा प्रयत्न,भुजबळांचा भाजपावर आरोप'राज्यातील सिंचन घोटाळ्यास अजित पवारही जबाबदार!'

मुंबई - विदर्भ आणि कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारास संबंधित खात्याचे मंत्री म्हणून तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार ठरतात, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी (27 नोव्हेंबर) सादर केले. त्यामुळे अजित पवारांसहीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंचन घोटाळासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांची पाठराखण केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिज्ञापत्र सादर करुन भाजपाकडून त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. 

न्यायव्यवस्थेवर विश्वास - अजित पवार
दरम्यान, याप्रकरणी बोलताना अजित पवार म्हणाले की, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. सिंचन घोटाळा प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सध्या त्यावर काही बोलू शकत नाही. चौकशीला सहकार्य करत राहीन. विरोधकांकडून जाणीवपूर्वक आरोप करण्यात येत आहे. 

(सिंचन घोटाळा प्रकरण : न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास; आता काही बोलू शकत नाही - अजित पवार)

अजितदादांचा पाय खोलात!
या प्रतिज्ञापत्रामुळे पवार गोत्यात येऊ शकतात. सिंचन घोटाळ्यात आजवर फक्त अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई झाली आहे. त्यामुळे सरकार पवार यांच्याबाबत कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही कारवाई झाल्यास अथवा न्यायालयाचा निर्णय आल्यास तो मोठा राजकीय भूकंप असेल, असे मानले जात आहे.

अशा प्रकारे झाली अनियमितता
सिंचन प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळण्यापूर्वीच निविदा मागवणे, अपात्र कंत्राटदार व संयुक्त उपक्रम कंपन्यांना निविदा जारी करणे, खोटे प्रमाणपत्र सादर करणा-या कंत्राटदारांना कंत्राट वाटप करणे, निर्धारित प्रक्रियेचे उल्लंघन करणे, सरकारच्या हिताविरुद्ध निर्णय घेणे, निवडक कंत्राटदारांना आर्थिक व विविध प्रकारचा फायदा करून देणे, दर्जाहीन कामे स्वीकारणे अशा प्रकारे सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

 

Web Title: Irrigation Scam : BJP Government harassing in the face elections, Chhagan Bhujbal's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.