रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 08:03 AM2024-03-01T08:03:24+5:302024-03-01T08:09:25+5:30

राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल २९ फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जारदार आरोप प्रत्यारोप सुरू होते.

Jayant Patil and Ajit Pawar criticized each other in the budget session maharashtra | रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

रोहित पवारांच्या भाषणावेळी भाजप आमदारांचा गोंधळ, जयंत पाटील वाचवायला आले; अजित पवारांनी टोला लगावला

Ajit Pawar ( Marathi News ) :मुंबई-  राज्याचे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल २९ फेब्रुवारी रोजी चौथ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जारदार आरोप प्रत्यारोप सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार आरोप करत टीका केली. काल लेखानुदानावर चर्चा सुरू होती. यावेळी रोहित पवार यांनी सरकारवर सरकारी बंगल्यावरील खर्चावरुन टीका सुरू केली, यावेळी भाजप आमदारांनी गोंधळ सुरू केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार पवार यांच्या बचावासाठी उभे राहिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला.  

मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल लेखानुदानावर चर्चा सुरू होती. यावेळी आमदार रोहित पवार यांनी सरकारवर सरकारी बंगल्यावरील खर्चावरुन टीका सुरू केली, यावेळी पवार यांच्या एका मुद्द्यावरुन भाजपचे आमदार मनीष चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले.यानंतर पवार यांच्या भाषणावेळी भाजप आमदारांनी गोंधळ सुरू केला. यावेळी जयंत पाटील यांनी उठून सत्ताधारी बाकांवरील सदस्यांवर आरोप केले. 

जयंत पाटील म्हणाले, आमदार रोहित पवार यांना आपली मते मांडण्याची मुभा आहे. अर्थमंत्र्यांनी त्यावर उत्तर देणे अपेक्षित होते, पण सत्ताधारी बाकावरील आमदारांचा अजित पवार यांच्यावर विश्वास नसल्याने तेच रोहित पवार यांच्या प्रत्येक मुद्द्याला उत्तरे देत आहेत, असा आरोप केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार म्हणाले, 'तुमचा तरी माझ्यावर कुठे विश्वास आहे'. 

 आमदारांनी गोंधळ सुरू केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार पवार यांच्या बचावासाठी उभे राहिले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला.  यावेळी सभागृहात एकच हशा पिकला.

काल अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप केले. राज्यातील गुन्हेगारी, सत्ताधारी आमदाराने केलेले गोळीबार या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरले. 

Web Title: Jayant Patil and Ajit Pawar criticized each other in the budget session maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.