"लोकांना छळायचं अन् आंदोलनं झालं की मजा बघायची; महाविकास आघाडी सरकारचा उरफाटा कारभार"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 10:04 PM2021-08-03T22:04:41+5:302021-08-03T22:05:29+5:30

भाजपानं २ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून पळ काढल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी केला होता. त्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

keshav upadhyay slams state government and congress over mumbai lockdown issue | "लोकांना छळायचं अन् आंदोलनं झालं की मजा बघायची; महाविकास आघाडी सरकारचा उरफाटा कारभार"

"लोकांना छळायचं अन् आंदोलनं झालं की मजा बघायची; महाविकास आघाडी सरकारचा उरफाटा कारभार"

googlenewsNext

भाजपानं २ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून पळ काढल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत यांनी केला होता. त्यावर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सावंत यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरुन काल हायकोर्टानं थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला अजून जाग आलेली नाही, असं प्रत्युत्तर केशव उपाध्ये यांनी दिलं आहे. 

लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार सुरू असल्याचा घणाघात उपाध्ये यांनी केला आहे. याशिवाय आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवता पण मुंबईकरांच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पाहत आहे, असा खोचक टोला उपाध्ये यांनी सावंत यांना लगावला आहे. 

काय म्हणाले होते सचिन सावंत?
मुंबईकरांना लोकलनं प्रवास करू दिला नाही तर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग आंदोलनाचा इशारा भाजपानं दिला होता. पण भाजपानं पुकारलेल्या आंदोलनचा फियास्को झाल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली होती. त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केला होता. यात सचिन सावंत यांनी भाजपानं २ ऑगस्टला जाहीर केलेल्या सविनय नियमभंग आंदोलनातून पळ काढला. ब्रिटिशांविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन देश करत होता तेव्हाही पळ काढला होता. प्रामाणिकपणा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही. जनतेच्या जीवावर आंदोलन करणारे होते. दुटप्पी भाजपाला ओळखलेली जनता आमच्यासोबत आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं होतं. 

Web Title: keshav upadhyay slams state government and congress over mumbai lockdown issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.