Maharashtra Politics: "ताज्या प्रश्नांनावरुन लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी"; अजित पवारांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 01:23 PM2023-04-09T13:23:23+5:302023-04-09T13:26:10+5:30

Maharashtra Politics: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.

Leader of Opposition Ajit Pawar criticized Chief Minister Eknath Shinde | Maharashtra Politics: "ताज्या प्रश्नांनावरुन लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी"; अजित पवारांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

Maharashtra Politics: "ताज्या प्रश्नांनावरुन लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची फालतुगिरी"; अजित पवारांचा CM शिंदेंवर हल्लाबोल

googlenewsNext

Maharashtra Politics: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शिवसेनेतील आमदारही अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. दरम्यान, आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या टीका केली होती. या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

Maharashtra Politics: “गेली अडीच वर्ष राज्यात रावणराज्य, आदित्य ठाकरेंनी रामराज्यावर बोलू नये”: श्रीकांत शिंदे

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी आहे. आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, अशी जोरदार टीका अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
   
अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांची त्यांनी बैठक घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कोणी ट्विटरवरुन आमच्यावर निशाणा साधला म्हणजे आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हौसे, नौसे, गौसे ट्विट करत राहणार त्यांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना पवार म्हणाले, प्रत्येकाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. तसेच, मुख्यमंत्री हे अयोध्येला श्री रामाच्या दर्शनासाठी गेले आहेत. पण आम्ही कुठे दर्शनासाठी जात असताना आम्ही कधी इकडे जाणार, तिकडे जाणार हे सांगत नाही, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. जातीचा, धर्माचा वापर माणसांमध्ये फूट पाडण्यात, द्वेष पसरवण्यात कोणी करू नये. एवढीच अपेक्षा आहे, असंही विरोधी पक्षनेते पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत न पाणी पिता आत्मक्लेश केला हे कुठल्या जाहीर भाषणांमध्ये मी वक्तव्य केलं होतं का? मी केलेले वक्तव्य चूकच होते. मात्र, घोंगडी बैठकीमध्ये तशा पद्धतीने वाक्य जायला नको होतं त्याबाबत मी आत्मक्लेश केलेला आहे. तेच तेच काढून बेरोजगारी आणि महागाई कमी होणार आहे का? असा सवाल अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. आत्ताच्या ताज्या प्रश्नांना डायव्हर्ट करण्याची मुख्यमंत्र्यांची ही फालतुगिरी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar criticized Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.