'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 07:00 PM2022-10-05T19:00:18+5:302022-10-05T19:00:26+5:30

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणाआधी एक महत्वाचा सल्ला दिला आहे.

Leader of Opposition Ajit Pawar has advised that 'Don't go to the lower level and criticize'. | 'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

'खालच्या पातळीवर जावून टिका करु नका'; अजित पवारांचा शिंदेंसह ठाकरेंनाही सल्ला

Next

मुंबई- दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाने आपापले मेळावे तुफान गर्दीचे करण्यासाठी कंबर कसली असून, जास्त गर्दी कोणाच्या मेळाव्यात होणार, याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक पोहचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील वर्षा या निवासस्थानावरुन बीकेसी मैदानासाठी रवाना झाले आहेत. 

 'जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे'; दसरा मेळाव्याच्या भाषणाआधी एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

शक्तिप्रदर्शनाची ही कांटे की टक्कर कोण जिंकणार, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे, शिंदे एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या भाषणाआधी एक महत्वाचा सल्ला दिला आहे. मेळावे घेत असताना कोणीही कमरेखाली वार करु नयेत, तसेच खालच्या पातळीवर जावून टिका करु नये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नाही, हे शाहू, फुले आंबेडकरांचा विचार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या होत असलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. तसेच या खुर्चीच्या बाजूला बाळासाहेबांची सावली समजले जाणारे चरणसिंग थापा उभे राहणार असल्याची माहितीही समोर येत आहे. चरणसिंग थापा यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केले होता.

शिंदे समर्थकांची गर्दी! मेळाव्याआधी 'या' गोष्टीत वरचढ ठरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

शिवतीर्थावरील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर देखील शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची ठेवण्यात आली आहे. याआधी देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात संजय राऊत यांच्या नावाची रिकामी खुर्ची व्यासपीठावर ठेवली होती. तसेच संजय राऊत एकटे लढत आहेत, मोडेन पण वाकणार नाही, असा आमचा संजय आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी कौतुक केले होते.

आधी कोण बोलणार?

दोन्ही मेळाव्यांची वेळ साधारणत: सारखीच आहे. मात्र, आधी उद्धव ठाकरे बोलणार की एकनाथ शिंदे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ठाकरे यांचे साधारणत: ८ ला सुरू होते. त्यांचे भाषण झाल्यावर त्याला शिंदे यांनी तडाखेबंद उत्तर द्यावे, असा शिंदे गटाचा प्रयत्न असेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Leader of Opposition Ajit Pawar has advised that 'Don't go to the lower level and criticize'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.