राजकीय हालचालींना वेग! अजित पवारांच्या बंगल्यावर 'मविआ'ची आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:37 PM2022-12-08T17:37:37+5:302022-12-08T17:42:28+5:30
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होणार आहे.
मुंबई- गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, भाजपने जोरदार मुसंडी मारत १५६ जागांवर विजय मिळवला. भाजपकडून या विजयाचा देशभरात जल्लोष सुरू आहे, महाराष्ट्र भाजपनेही विजयी जल्लोष केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पुढच मिशन मुंबई महानगरपालिकेची घोषणा दिली आहे. या पार्श्वभूमिवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंगल्यावर बैठक होणार आहे.
या बैठकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, भाई जगताप, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. काही वेळातच या बैठकीला सुरूवात होणार आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधान विरोधात १७ डिसेंबर रोजी मार्चा काढण्यात येणार आहे. या संदर्भात ही बैठक होणार आहे.
Amit Shah : "पोकळ आश्वासने देणाऱ्यांना जनतेने नाकारले अन्..."; ऐतिहासिक विजयानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया
तसेच काही दिवसातच हिवाळी अधिवेशन होणार आहे. यावरही या बैठकीत पुढची रणनीती ठरवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसापूर्वीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर महाविकास आघाडीची बैठक झाली होती. आता आठवड्यात दुसऱ्यांदा बैठक होत आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. हा विधानावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी राज्यभरातून येत आहे. यावरुन महाविकास आघाडीनेही आक्रमक भूमिका घेतलेली आहे.