दणदणाटावर येणार मर्यादा, साउंड सिस्टीम चालकांना मात्र बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 03:49 AM2018-09-23T03:49:49+5:302018-09-23T03:50:03+5:30

गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने साउंड सिस्टीमवर घातलेली बंदी शुक्रवारी कायम ठेवली. परिणामी रविवारी साउंड सिस्टीमचा दणदणाट होणार नाही.

The limitations on the soundtrack, but the sound system drivers will be hit | दणदणाटावर येणार मर्यादा, साउंड सिस्टीम चालकांना मात्र बसणार फटका

दणदणाटावर येणार मर्यादा, साउंड सिस्टीम चालकांना मात्र बसणार फटका

Next

मुंबई  - गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने साउंड सिस्टीमवर घातलेली बंदी शुक्रवारी कायम ठेवली. परिणामी रविवारी साउंड सिस्टीमचा दणदणाट होणार नाही. या निकालावर साउंड सिस्टीमधारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सर्वसामान्यांनी मात्र हा निकाल
दिलासादायक असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे साउंड सिस्टीमधारकांनी आम्हाला आर्थिक तोटा होणार असल्याचे म्हटले आहे.
सर्वसामान्यांनी आवाजाला दुय्यम स्थान देत आरोग्याला प्रथम स्थान दिले आहे. मोठ्या आवाजाचा रुग्णांना शिवाय नागरिकांना त्रास होतो. आवाज मर्यादेत असेल तर ठीक आहे. मात्र आवाज मर्यादेबाहेर जातो तेव्हा मात्र ते सहन होत नाही. मुळात उत्सवाला कोणाचाच विरोध नाही. विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. मुद्दा आहे तो ध्वनिप्रदूषण न करण्याचा. ध्वनिप्रदूषण न करता उत्सव साजरे करता येतात आणि ते कित्येक मंडळांनी प्रत्यक्ष कृतीत उतरून दाखविल्याने पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नागरिकांकडूनच प्रत्यक्षात केले जात आहे. दरम्यान, न्यायालयाने याबाबतची याचिका प्रलंबित ठेवत राज्य सरकारला या प्रकरणी चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे साउंड सिस्टीमधारकांच्या ‘पाला’ संघटनेने या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.


न्यायालयाच्या विरोधात जाऊन कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत. त्यामुळे दहा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनादिवशी साउंड सीस्टिम
वाजविले जाणार नाही. याचिकाकर्त्यांना एवढेच विचारायचे आहे की, उत्सवालाच साउंड सीस्टिमचा त्रास होतो का? तसेच लावले जाणारे स्पीकर हे धोकादायक आहे, असे सिद्ध केले आहे. नेत्यांच्या सभेमध्ये लावले जाणारे साउंड सीस्टिम हेच असतात, मग तेव्हा धोकादायक नाही का? कुठल्याही
मशिनचा आवाज हा सारखा येत असेल, त्याला ध्वनिप्रदूषण म्हटले जाते. विलेपार्ले येथे विमानाच्या आवाजाचा किती त्रास होतो, मग हा आवाज कुणी बंद केला आहे का? साउंड सीस्टिममध्ये आवाज कमी-जास्त करण्यासाठी बटणे असतात. साउंड सीस्टिम व्यवसायावर बंदी आणून चालणार नाही, तर यावर नियम व अटी लागू करा.
- कमलेश खांडेकर,
कमलेश साउंड सीस्टिम, मालाड.

लाऊड स्पीकर आणि इतर म्युझिक सीस्टिमवर बंदी असणे आवश्यक आहे. जे लोक लाउड स्पीकरच्या बंदीला विरोध करत आहेत, त्यांच्याच आरोग्याला सर्वात जास्त धोका निर्माण होत आहे. साउंड सीस्टिमचा परिणाम साउंड आॅपरेटरवर सर्वात जास्त होतो. आवाजामुळे मानवाला अनेक व्याधी जडतात. मात्र, आर्थिक तोट्यापेक्षा मानवी आरोग्य, जीवन महत्त्वाचे आहे. साउंड आॅपरेटर्सना व्यवसायाचे दुसरे पर्याय उपलब्ध होतील. मात्र, मानवी आरोग्यासाठी हे होईल का? काही वर्षांनंतर सर्व परिस्थिती सुधारेल. विसर्जनाच्या वेळी ५५ डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे. मात्र, आवाजाच्या लहरी ११२
डेसिबलपर्यंत गेल्याच्या नोंदी आहेत.
- सुमेरा अब्दुलाली, आवाज फाउंडेशन.

सरकारने साउंड सिस्टीमची परवानगी पूर्णत: नाकारता कामा नये. एक वेळ आणि मर्यादा आखायला पाहिजे होती. नवरात्रीमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत साउंड सिस्टीमला परवानगी दिली जाते. तशी गणेशोत्सवाला एक वेळ दिली पाहिजे. नवरात्रीमध्ये साउंड वाजवला जाणार आहे. सध्या साउंड
सिस्टीमचा ट्रेंड वाढला असून तरुणाई यासाठी वेडी आहे. त्यामुळे तरुणवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
- अनिकेत नाईक, विद्यार्थी

पाश्चिमात्य म्युझिक सिस्टीम आणून पारंपरिक वाद्याला विसरता कामा नये. गायन, भजन या पारंपरिकतेला चालना मिळणे आवश्यक असून या कला जिवंत राहायला पाहिजेत. दरम्यान, ध्वनिप्रदूषणामुळे मानवाला उच्च रक्तदाबाचा त्रास, स्मरणशक्ती कमी होणे, आजारी पडणे, कर्णबधिर होणे,
तान्ह्या बाळाला त्रास होतो. याकडे दुर्लक्ष होता कामा नये. याचे पडसाद आरोग्यावर होतात. तसेच मानवासह पशुपक्ष्यांना ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे
लागते.
- कौस्तुभ दरवेस, नॅचरल हिस्ट्री सोसायटी

मागील वर्षी ‘श्री’च्या आगमन सोहळ्यापासून ते विसर्जन सोहळ्यापर्यंत प्रत्येक दिवशी एक किंवा दोन साउंडच्या आॅर्डर मिळत होत्या. मात्र, या वर्षी एकही आॅर्डर नसल्याने घरी बसण्याची वेळ आली आहे. आमच्या ग्रुपमध्ये एकूण २५ लोक काम करत आहेत. आमच्याकडे सात लाखांची म्युझिक सीस्टिम आहे. एक-एक आॅर्डर घेऊन प्रत्येक मशिन खरेदी केली आहे. एक मशिनीची किंमत साधारण ७५ हजारांपासून सुरू होते. एका आॅर्डरमागे २० हजार रुपये मिळायचे. मात्र, यंदा काहीच झाले नाही.
- शिवम सोनार, साउंड आॅपरेटर, कुर्ला.

गणपतीवर सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे देवावर कोणी बोलले, तर संबंधितांच्या भावना दुखविल्या जातात. मात्र, आता प्रश्न देवाचा नसून होणाऱ्या त्रासाचा आहे. पहिल्या काळातील गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीचे साजरा व्हायचा, परंतु आता सण साजरे करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक आणि आजारी माणसे आहेत. मोठ्या तीव्रतेच्या आवाजामुळे ज्येष्ठांना वा आजारी रुग्णांना त्रास होतो. न्यायालय सर्वांचा विचार करूनच निर्णय देतो. या निर्णयाचा हसत खेळत स्वीकार केला पाहिजे.
- धर्मेश बरई, पर्यावरणप्रेमी.

Web Title: The limitations on the soundtrack, but the sound system drivers will be hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.