Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 08:31 AM2024-05-08T08:31:24+5:302024-05-08T08:32:44+5:30

Ajit Pawar On Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार शरद पवार यांच्या तब्येतीवरुन भाष्य केलं आहे.

lok sabha election 2024 Ajit Pawar criticized leaders including Supriya Sule over MP Sharad Pawar's health | Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग

Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग

Ajit Pawar On Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, दोन दिवसापूर्वी बारामतीमध्ये झालेल्या सांगता सभेवेळी खासदार शरद पवार यांची तब्येत बिघडली होती. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'बोल भिडू' या यूट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केले आहे. यावेळी पवार यांनी २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतील प्रसंग सांगितला.

पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला

२००४ मध्ये असाच पवार साहेबांना (Sharad Pawar) गंभीर आजार झाला होता. साहेबांचा आम्ही फॉर्म भरला तेव्हा त्यांनी एक ऑपरेशन तातडीने करणे गरजेचे आहे असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे सेनापती निवडणुकीत नाही सैन्याने ही निवडणूक लढवायची आहे म्हणाले. आम्ही त्यावेळी त्यांच्यासमोर सगळेजण दिग्गज नेते होतो, तेव्हा आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले. आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि निवडणुकीची जबाबदारी उचलली, साहेब ब्रिच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत होते. तेव्हा आम्ही प्रचाराची जबाबदारी पार पाडली, "आता सगळ्यांनी पवार साहेबांना आराम करायला सांगायला हवं होतं. साहेब तुम्ही आराम करा आम्ही या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पार पाडू, असं सांगायला हवं होतं. जयंत पाटील, डॉ.अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुप्रिया सुळे या सर्वांनी ही जबाबदारी पार पाडायला हवी होती, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवार म्हणाले, तुमचे वडील आजारी असले आणि ते प्रचारामध्ये येत असले तर आपण त्यांना सांगत नाही का? की पहिल्यांदा तब्येत चांगली पाहिजे, पहिल्यांदा तब्येतीचा विचार केला पाहिजे. हे महत्वाच नाही, तब्येत महत्वाची आहे. त्या पद्धतीने विश्रांती घेऊन या सर्व गोष्टी करायला पाहिजेत.माझी तिच भावना आहे. मी जर त्यांच्याबरोबर असतो तर मी सांगितलं असतं की, साहेब २००४ ला असाच प्रसंग आला होता. आपण दवाखान्यात होता आम्ही सर्वांनी निवडणूक पार पाडली आणि त्यावेळी बऱ्यापैकी जागा निवडून आणल्या. यात आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे दोघेजण साहेबांना सारख सांगतात, बाकीच्यांचं कुणाच जास्त चालत नाही, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले.

सिनिअर नेत्यांना सांगायला हवं होतं

"मी या पूर्वीही फॅमिली मेंबर होतो आजही आहे. पूर्वी मी,आर आर पाटील, भुजबळ साहेब ठरवायचो आणि त्या पद्धतीने काम करायचो. आम्ही त्यावेळी कुटुंब म्हणूनच काम करायचो. आताच्या काळात त्यांना बोलताना जर एवढा त्रास होत होता तर यांनी सांगायला हवं होतं.आता यांच्यातील सुप्रिया पण ५४ वर्षाची आहे, जयंतराव पाटील सिनिअर आहेत, अमोल कोल्हे, अनिल देशमुख आहेत यांनी का सांगितलं नाही, असा सवालही अजित पवार यांनी केला. 

Web Title: lok sabha election 2024 Ajit Pawar criticized leaders including Supriya Sule over MP Sharad Pawar's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.