Lok Sabha Election 2024 : 'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 04:05 PM2024-04-08T16:05:21+5:302024-04-08T16:05:55+5:30

Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली.

Lok Sabha Election 2024 MLA Ravi Rana claimed that Leader of Opposition Vijay Vaddetiwar will join BJP | Lok Sabha Election 2024 : 'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा

Lok Sabha Election 2024 : 'वडेट्टीवार लोकसभेनंतर भाजपामध्ये जाणार, थोड्या दिवसात सगळंच क्लिअर होईल'; 'या' नेत्याचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला. काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा मोठा दावा रवी राणा यांनी यावेळी केला. राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार नवनीत राणा भाजपामधून निवडणूक लढवत आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना...! 'हा' नेता घरवापसी करून कमळ चिन्हावर लढणार?

काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, नवनीत राणा या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भरोशावर निवडून आल्या आहेत.आता त्यांची भूमिका बदलली आहे, अशी टीका वड्डेटीवार यांनी राणा यांच्यावर केली होती. या टीकेली प्रत्युत्तर आमदार रवी राणा यांनी दिले आहे. आमदार रवी राणा म्हणाले, वडेट्टीवार भाजपाच्या संपर्कात आहेत, हे चित्र स्पष्ट आहे. ते आता काँग्रेसच्या लोकांची दिशाभूल करत आहे. त्यांचा विश्वास रहायला पाहिजे  म्हणून ते बोलत आहेत, असंही रवी राणा म्हणाले. 

"लोकसभा झाल्यानंतर विजय वडेट्टीवार भाजपामध्ये प्रवेश करणार"
 
"वडेट्टीवार लोकसभा झाल्यानंतर भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यांचं सगळं ठरले आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर ते कुठून आले, कुठे गेले हे सगळं कळेल. यात सगळा इतिहासात दडपले आहे. ते भाजपामध्ये येत आहेत. आम्ही त्यांचा सन्मान करतो, त्यांच्यावर जास्त मी बोलणार नाही, असंही आमदार रवी राणा म्हणाले. 

Web Title: Lok Sabha Election 2024 MLA Ravi Rana claimed that Leader of Opposition Vijay Vaddetiwar will join BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.