पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 05:50 IST2025-03-07T05:49:15+5:302025-03-07T05:50:47+5:30

नाना पटोले म्हणाले की, ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वीच ही बातमी आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या ठेवी संकटात असल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत.

lokmat news about credit unions causes backlash in the legislative assembly nana patole demand government statement | पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी

पतसंस्थांबद्दल ‘लोकमत’च्या बातमीचे विधानसभेत पडसाद; सरकाने निवेदन करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील २००८ सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्या असून त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताचे पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. काँग्रेसचेनाना पटोले यांनी या प्रकरणी सरकारने निवेदन करावे अशी मागणी केली.

पटोले म्हणाले की, ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वीच ही बातमी आली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपल्या ठेवी संकटात असल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत. या प्रकरणी सरकारने निवेदन करावे अशी मागणीही पटोले यांनी केली.

त्यावर, अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ देऊन आपण माहिती दिली आहे, ती माझ्याकडे पाठवावी. अधिक काही माहिती असेल तीदेखील द्यावी. ही माहिती तपासून मी सरकारला निवेदन करण्याचे निर्देश देईन.

 

 

 

Web Title: lokmat news about credit unions causes backlash in the legislative assembly nana patole demand government statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.