अंधेरीचा महागणपती यंदा शिवकालीन मंदिरात विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:18 AM2018-09-22T02:18:14+5:302018-09-22T02:20:38+5:30

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंधेरीच्या महागणपतीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

MahaGanapatyara of Andheri sitting in the temple of Shiva this time | अंधेरीचा महागणपती यंदा शिवकालीन मंदिरात विराजमान

अंधेरीचा महागणपती यंदा शिवकालीन मंदिरात विराजमान

Next

- मनोहर कुंभेजकर 
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर येथील गणेश चौकात यंदा अकरा दिवस विराजमान झालेल्या अंधेरीच्या महागणपतीचा यंदा सुवर्ण महोत्सव असून भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस जयवंत परब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अंधेरीच्या महागणपतीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यंदा कलादिग्दर्शक नरेंद्र भगत यांनी ३० बाय ७० मंडपात २५ बाय ४५ आकारात सुंदर शिवकालीन पुरातन मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून येथील डी.एन. नगर मेट्रो स्थानकापासून जवळ असलेला देखावा बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी.एन. नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जयवंत परब यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष अविनाश तोडणकर, सचिव शिवशंकर धामापूरकर व खजिनदार संजय पोवळे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यंदाचा येथील सुवर्णमहोत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेत आहेत. अंधेरीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डी.एन. नगर करत असलेले समाजोपयोगी उपक्रम स्तुत्य आहेत. निधी दीनदुबळ्यांना आधार देण्यासाठी खर्च केला जातो. वैद्यकीय उपचार/शस्त्रक्रियेसाठी साहाय्यता केली जाते, असे जयवंत परब यांनी सांगितले.

Web Title: MahaGanapatyara of Andheri sitting in the temple of Shiva this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.