मुंबईत सर्वाधिक अमराठी उमेदवार कुणाचे, महाविकास आघाडी की महायुती? वाचा यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 02:47 PM2024-11-04T14:47:41+5:302024-11-04T14:49:04+5:30
मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी २ जागांवर मराठी उमेदवार दिलेत असा आरोप करत भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे त्यात मुंबईतच्या ३६ जागांवर सर्वांचं लक्ष आहे. मुंबईत महायुतीविरुद्द महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. परंतु मनसेनेही मुंबईतल्या काही जागांवर उमेदवार उतरवल्याने तिथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईत मराठी आणि अमराठी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा कायम चर्चेत असतो. त्यात भाजपाने काँग्रेसवर फक्त २ मराठी उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबईतील ३६ जागांवर महायुती, मविआ आणि मनसेकडून किती अमराठी उमेदवारांना तिकिट दिलंय हे जाणून घेऊया.
दहिसर
विनोद घोसाळकर - ठाकरे सेना, मविआ
मनीषा चौधरी - भाजपा, महायुती
राजेश येरुणकर - मनसे
बोरिवली
संजय उपाध्याय - भाजपा, महायुती (अमराठी)
संजय भोसले - ठाकरे सेना, मविआ
कुणाल माईनकर - मनसे
मागाठाणे
प्रकाश सुर्वे - शिंदेसेना, महायुती
उदेश पाटेकर - ठाकरे सेना, मविआ
नयन कदम - मनसे
चारकोप
यशवंत सिंह - काँग्रेस, मविआ (अमराठी)
योगेश सागर - भाजपा, महायुती (अमराठी)
दिनेश साळवी - मनसे
गोरेगाव
समीर देसाई - ठाकरे सेना, मविआ
विद्या ठाकूर - भाजपा, महायुती (अमराठी)
विरेंद्र जाधव - मनसे
कांदिवली पूर्व
अतुल भातखळकर - भाजपा, महायुती
काळू बुधेलिया - काँग्रेस, मविआ (अमराठी)
महेश फारकसे - मनसे
मालाड पश्चिम
अस्लम शेख - काँग्रेस, मविआ (अमराठी)
विनोद शेलार - भाजपा, महायुती
दिंडोशी
संजय निरुपम - शिंदे सेना, महायुती ( अमराठी)
सुनील प्रभू - ठाकरे सेना, मविआ
भास्कर परब - मनसे
वर्सोवा
हारून हाजी इस्माइल खान - ठाकरे सेना, मविआ (अमराठी)
डॉ. भारती लव्हेकर, भाजपा, महायुती
संदेश देसाई - मनसे
जोगेश्वरी पूर्व
अनंत बाळा नर - ठाकरे सेना, मविआ
मनीषा वायकर - शिंदे सेना, महायुती
भालचंद्र अंबुरे - मनसे
अंधेरी पूर्व
मुरजी पटेल - शिंदेसेना, महायुती (अमराठी)
ऋतुजा लटके - ठाकरे सेना, मविआ
अंधेरी पश्चिम
अशोक जाधव - काँग्रेस, मविआ
अमित साटम - भाजपा, महायुती
विलेपार्ले पूर्व
पराग आळवणी - भाजपा, महायुती
संदीप नाईक - ठाकरे सेना, मविआ
जुईली शेंडे - मनसे
चांदिवली
आरिफ खान - काँग्रेस, मविआ (अमराठी)
दिलीप लांडे - शिंदे सेना, महायुती
महेंद्र भानुशाली - मनसे ( अमराठी)
भायखळा
यामिनी जाधव - शिंदे सेना, महायुती
मनोज जामसुतकर - ठाकरे सेना, मविआ
भांडुप पश्चिम
अशोक पाटील - शिंदे सेना, महायुती
रमेश कोरगावकर - ठाकरे सेना, मविआ
शिरीष सावंत - मनसे
मुलुंड
संगीता वाजे - राष्ट्रवादी, मविआ
मिहिर कोटेचा - भाजपा, महायुती (अमराठी)
मानखुर्द शिवाजीनगर
नवाब मलिक - राष्ट्रवादी (अमराठी)
अबु आझमी - सपा, मविआ (अमराठी)
सुरेश पाटील - शिंदे सेना
जगदीश खांडेकर - मनसे
मलबार हिल
बेहूरलाल चौधरी - ठाकरे सेना, मविआ (अमराठी)
मंगलप्रभात लोढा - भाजपा, महायुती ( अमराठी)
कुलाबा
राहुल नार्वेकर - भाजपा, महायुती
हिरा देवासी - काँग्रेस, मविआ (अमराठी)
चेंबूर
प्रकाश फातर्पेकर - ठाकरे सेना, मविआ
तुकाराम काते - शिंदे सेना, महायुती
माऊली थोरवे - मनसे
घाटकोपर पूर्व
पराग शाह - भाजपा, महायुती (अमराठी)
राखी जाधव - राष्ट्रवादी, मविआ
संदीप कुलथे - मनसे
घाटकोपर पश्चिम
संजय भालेराव - ठाकरे सेना, मविआ
राम कदम - भाजपा, महायुती
गणेश चुक्कल - मनसे
माहिम
सदा सरवणकर - शिंदे सेना, महायुती
महेश सावंत - ठाकरे सेना, मविआ
अमित ठाकरे - मनसे
वांद्रे पूर्व
झिशान सिद्दीकी - राष्ट्रवादी, महायुती (अमराठी)
वरुण सरदेसाई - ठाकरे सेना, मविआ
तृप्ती सावंत - मनसे
वांद्रे पश्चिम
आशिष शेलार, भाजपा, महायुती
आसिफ झकारिया, काँग्रेस, मविआ (अमराठी)
विक्रोळी
सुवर्णा कारंजे, शिंदे सेना, महायुती
सुनील राऊत - ठाकरे सेना मविआ
विश्वजित ढोलम, मनसे
शिवडी
अजय चौधरी, ठाकरे सेना, मविआ
बाळा नांदगावकर - मनसे
मुंबादेवी
अमिन पटेल, काँग्रेस, मविआ (अमराठी)
शायना एन सी - शिंदे सेना, महायुती (अमराठी)
वरळी
आदित्य ठाकरे- ठाकरे सेना, मविआ
मिलिंद देवरा - शिंदे सेना, महायुती (अमराठी)
संदीप देशपांडे - मनसे
वडाळा
कालिदास कोळंबकर, भाजपा, महायुती
श्रद्धा जाधव - ठाकरे सेना, मविआ
स्नेहल जाधव , मनसे
कलिना
संजय पोतनीस, ठाकरे सेना, मविआ
अमरजित सिंह - भाजपा, महायुती ( अमराठी)
बाळकृष्ण हुतगी - मनसे
कुर्ला
मिलिंद कांबळे, राष्ट्रवादी, मविआ
मंगेश कुडाळकर - शिंदे सेना, महायुती
प्रदीप वाघमारे - मनसे
अणुशक्तीनगर
अविनाश राणे , शिंदे सेना
सना मलिक शेख - राष्ट्रवादी अजित पवार (अमराठी)
फहाद अहमद - राष्ट्रवादी, मविआ ( अमराठी)
नवीन आचार्य - मनसे
धारावी
राजेश खंदारे - शिंदे सेना, महायुती
ज्योती गायकवाड - काँग्रेस, मविआ
सायन कोळीवाडा
कॅप्टन तामिल सेल्वन- भाजपा, महायुती (अमराठी)
गणेश यादव - काँग्रेस, मविआ ( अमराठी)
संजय भोगले - मनसे
मुंबईतल्या ३६ जागांचा आढावा घेतला तर याठिकाणी महायुतीने १३ जागांवर, मविआने १२ जागांवर अमराठी उमेदवार उतरवले आहेत.