काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:01 PM2024-10-31T16:01:57+5:302024-10-31T16:03:50+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महायुतीचे सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis claims in next few days many congress leaders join bjp | काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”

काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो अनेक पक्षातील नाराज उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवत सरळ अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अर्ज माघे घेण्याची अंतिम मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ऑफर दिल्या जात आहेत. या घडामोडींमध्ये काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. रवी राजा यांना सायन कोळीवाडा या ठिकाणाहून उमेदवारी हवी होती. मात्र काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले रवी राजा यांनी भाजपात प्रवेश केला. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवले. रवी राजा तीन दशकांहून अधिक काळ काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसला कोल्हापूरमध्येही मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत रवी राजा यांच्या पक्षप्रवेश झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. 

पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक भाजपामध्ये प्रवेश करणार

रवी राजा यांच्यासारखा मातब्बर नेता, ज्यांनी मुंबई महापालिका गाजवली, विरोधी पक्षनेते होते. आक्रमक भूमिका मांडणारे नेते. पाच टर्म महापालिकेत निवडून आले. एक विक्रम त्यांच्या नावाने आहे, २३ वर्ष त्यांनी बेस्टचे सदस्य म्हणून काम केले. बेस्ट संदर्भात पालिकेत रवी राजा यांच्याकडे ऑथेरिटी म्हणून बघितले जाते. जनसंपर्क असलेला नेता आहे. काँग्रेस नेत्यांशी त्यांचा कनेक्ट आहे. रवी राजा यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला मिळेल. रवी राजा यांच्या माध्यमातून आमच्या संपर्कात अनेक लोक येत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचे प्रमुख लोक त्यांच्या संपर्कातून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ही नावे आज विचारू नका. प्रवेश होईल तेव्हाच सांगेन, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान, पालिकेत आणि मुंबई शहरात ज्यांनी काँग्रेस टिकवून ठेवली, त्यापैकी रवी राजा आहे. रवी राजा यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. सायनमध्ये त्यांचे काम मोठे आहे. जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचे सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. दिवाळी दोन दिवस आहे. साधारण ४ ते ५ तारखेने जोराने प्रचार सुरू होईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 dcm devendra fadnavis claims in next few days many congress leaders join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.