Maharashtra Budget 2020 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची 'महाभेट'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 11:35 AM2020-03-06T11:35:38+5:302020-03-06T11:54:18+5:30

Maharashtra Budget 2020 : 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे

Maharashtra Budget 2020 : 50,000 incentive funds to farmers who regularly make loans, Ajit pawar says in vidhan sabha | Maharashtra Budget 2020 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची 'महाभेट'

Maharashtra Budget 2020 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडीची 'महाभेट'

Next

मुंबई - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करुन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पास विधानसभेत प्रवेश केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली.  

अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावताना, हरिवंशराय बच्चन यांच्या दोन पंक्ती सभागृहात म्हणून दाखवल्या.  
असफलता एक चुनौती है, उसे स्विकार करो
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो

सोपी सुलभ, हेलपाटे न घालता, सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी 2015 ते 2019-19 या कालावधीतील 2 लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले.

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीतील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी सन 2017 ते 2019 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून 2020 पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असल्यास, त्या शेतकऱ्यांना 2018-19 या वर्षात घेतलेल्या पिककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर म्हणून देण्यात येईल. तसेच, ही रक्कम 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास, कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 
पुछ अगले बरस मे क्या होगा, 
मुझसे पिछले बरस की बात न कर
ये बता हाल क्या लाखों का, 
मुझसे दो-चार-दस की बात न कर... 

असा शेअर म्हणत अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित आमदारांची दाद मिळवली.  
 

Web Title: Maharashtra Budget 2020 : 50,000 incentive funds to farmers who regularly make loans, Ajit pawar says in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.