महाराष्ट्र बजेट 2020: अर्ज किया है... अजितदादांचा 'शायराना अंदाज' पाहून म्हणाल क्या बात, क्या बात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:10 PM2020-03-06T13:10:16+5:302020-03-06T14:31:42+5:30
शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजकांना डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2020 विधानसभेत सादर केला.
मुंबई - उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करुन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पासह विधानसभेत प्रवेश केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. अर्थसंकल्प सादर करताना, अजित पवार यांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला.
शेतकरी, तरुण, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि उद्योजकांना डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2020 विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानत हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले. तसेच, शेतकरी कर्जमाफी योजनेची माहितीही दिली. अजित पवारांनी अर्थसंकल्प सादर करताना, शेरोशायरी करत विरोधकांना लक्ष्य केले. केंद्र सरकारकडून जीएसटी रक्कम आणि निधी अद्याप संपूर्णपणे प्राप्त झाला नसल्याचे ते म्हणाले.
विरोधकांना टोला लगावताना, हरिवंशराय बच्चन यांच्या दोन पंक्ती अजित पवारांनी सभागृहात म्हटल्या.
असफलता एक चुनौती है, उसे स्विकार करो
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो
तरुणांना कुशल उद्योजकाचे धडे देण्याचं सांगत, तसेच नव तरुणांसाठी प्रशिक्षण संस्था उभारण्याचे आश्वासन देत अजित पवार यांनी पुन्हा विरोधकांना लक्ष केले.
पुछ अगले बरस मे क्या होगा,
मुझसे पिछले बरस की बात न कर
ये बता हाल क्या लाखों का,
मुझसे दो-चार-दस की बात न कर...
असा शायराना मिजाज अजित पवार यांचा पाहायला मिळाला.
या खालील शायरीवर अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित आमदारांची दाद मिळवली.
कौन कहता है आसमाँ मे सुराख नही हो सकता,
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों...
तसेच, महात्मा फुलेंच्या शिक्षणांसदर्भातील पंक्तीही त्यांनी म्हटल्या.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।