महाराष्ट्र बजेट 2020: चूक झाली... त्यांची चूक झाली... अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची चूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 04:00 PM2020-03-06T16:00:27+5:302020-03-06T16:01:30+5:30
अजित पवार यांनी अनेक संकटांचा सामना करत आणि आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असे सूचवले.
मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्याचा सन 2020 चा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. अर्थसंकल्प सादर करतेवळी अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करताना शायरी केली. तसेच, मागील परिस्थितीच विचार न करता, सद्यपरिस्थितीला तोंड दिले पाहिजे, असे म्हणतानाही त्यांनी कविता केली.
अजित पवार यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी असे म्हणत कोशीश करनेवालों की हा नही होती... या कवितेतील दोन ओळी वाचून दाखवल्या.
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो !
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो !!
असे म्हणत अजित पवार यांनी अनेक संकटांचा सामना करत आणि आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार असे सूचवले. मात्र, ही कविता वाचता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचं सांगणं ही अजित पवारांची चूक होती. कारण, स्वत: अमिताभ बच्चन यांनीच याबाबत खुलासा केला आहे. अमिताभ यांनी 6 मे 2018 साली ट्विट करुन ही कविता हरिवंशराय बच्चन यांची नसून याचे कवि/रचनाकार सोहनलाल द्विवेदी आहेत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे, अजित पवार यांनी कवितेतील दोन ओळींचा उल्लेख करताना हरिवंशराय बच्चन असे म्हणणं ही त्यांची चुकीचं होती.
संपूर्ण कविता
लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती
असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती.