महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 01:11 PM2020-03-06T13:11:15+5:302020-03-06T13:18:53+5:30

महाराष्ट्र बजेट 2020 : दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडणार आहे. सर्वसामान्यांना करवाढीमुळे दरवाढीचा झटका बसणार आहे.

Maharashtra Budget 2020 Petrol, diesel will cost more with Re 1 hike in taxes SSS | महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

महाराष्ट्र बजेट 2020 : पेट्रोल, डिझेल महाग होणार, करवाढीमुळे दरवाढीचा झटका

Next
ठळक मुद्देपेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आज इंधनावर उपकर आकारण्याची घोषणा केली.पुढील दोन वर्षांसाठी हा उपकर आकारला जाईल.

मुंबई - अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी (6 मार्च) जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडणार आहे. सर्वसामान्यांना करवाढीमुळे दरवाढीचा झटका बसणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल महाग होणार आहे. वाहन इंधनाच्या दरात म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी आज इंधनावर उपकर आकारण्याची घोषणा केली आहे. पुढील दोन वर्षांसाठी हा उपकर आकारला जाईल. ही रक्कम पर्यावरणीय समस्यांसाठी काम करणाऱ्या ग्रीन फंडाकडे पाठवली जाणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. शुक्रवारी (6 मार्च) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 15 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.83 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 14 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 66.81रुपये आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली. अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावताना, हरिवंशराय बच्चन यांच्या दोन पंक्ती सभागृहात म्हणून दाखवल्या.  
असफलता एक चुनौती है, उसे स्विकार करो
क्या कमी रह गयी, देखो और सुधार करो
सोपी सुलभ, हेलपाटे न घालता, सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांनी 2015 ते 2019-19 या कालावधीतील 2 लाखापर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नियमित कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार यांनी सभागृहात जाहीर केले.

गेल्या काही वर्षांपासून अर्थव्यवस्थेला मरगळ आल्यानं बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्याला चालना देण्यासाठी अजित पवारांनी मोठी घोषणा केली. मुद्रांक शुल्कात एक टक्का कपात करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पुढील दोन वर्षांसाठी ही सवलत देण्यात आली आहे. एमएमआरडीए, पुणे, नागपूरमध्ये  महापालिका क्षेत्रात येणाऱ्या बांधकांमांना ही सवलत लागू असेल. यामुळे राज्याला २५ हजार कोटींचं नुकसान होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलत देण्यात येणार आहे. 


 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र बजेट 2020 Live: अर्थमंत्र्यांच्या 'त्या' घोषणेनंतर सगळ्या आमदारांनी वाजवले बाक

'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र सीआयडी वेबसाईट हॅक!

एका मिनिटात ४ लाख कोटी स्वाहा; येस बँक, कोरोनामुळे शेअर बाजार गडगडला

China Coronavirus : 'सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची कोरोना तपासणी करा'

 

Web Title: Maharashtra Budget 2020 Petrol, diesel will cost more with Re 1 hike in taxes SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.