Maharashtra Budget 2023: १४ मार्चला सरकार कोसळण्याची भीती; अजित पवारांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:39 PM2023-03-09T16:39:20+5:302023-03-09T16:39:35+5:30

Maharashtra Budget 2023: आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget 2023: Ajit Pawar claimed that the budget was merely announced as there was a fear that the government would collapse on March 14 | Maharashtra Budget 2023: १४ मार्चला सरकार कोसळण्याची भीती; अजित पवारांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

Maharashtra Budget 2023: १४ मार्चला सरकार कोसळण्याची भीती; अजित पवारांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

googlenewsNext

मुंबई: आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला.(Maharashtra Budget 2023) या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. 'चुनावी जुमला असतो ना...तसाच हा अर्थसंकल्प आहे. दूरदृष्टीचा अभाव अन् वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प असल्याची टीका अजित पवारांनी केली. 

स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. राज्याची काय परिस्थिती आहे, उत्पन्न आणि खर्च किती आहे, ते पाहायाल हवं होतं. आज संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये भरीव मदत करतील, अशी अपेक्षा होती, पण झाली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृहात घोषणा सुरू होत्या, पण पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झालेल्या स्मारकाबद्दल काहीच घोषणा नाही. फक्त लोकांना बरं वाटण्यासाठी सरकारने घोषणा केल्या. तसेच याच काळात १४ मार्चला सरकार कोसळणार असल्याची भीती असल्याने अर्थसंकल्पात निव्वळ घोषणा करण्यात आल्याचा दावा अजित पवारांनी यावेळी केला. 

गेल्यावेळेस मी अर्थसंकल्प सादर केला होता, त्यात आम्ही पंचसूत्री कार्यक्रम आणला होता, तर यांनी पंचामृत आणला. मूळात अमृत कुणीच बिघतलं नाही. तशाच प्रकारे हे विकासाचे पंचामृत आहे, ते कधीच दिसणार नाही. जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवून आणण्याचा प्रयत्न झालाय. त्यांनी २०१४ मध्ये केलेल्या घोषणांची आज काय अवस्था आहे? राज्यातील उद्योग इतर राज्यात जातायेत, निधी योग्यरित्या खर्च होत नाहीये. यांनी फक्त घोषणा देण्याचे काम केले आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान, अर्थसंकल्पात अनेक महामंडळाची नावे घेतली, पण त्यांना किती निधी देणार हे सांगितलं नाही. कुठल्याही बाबतीत ठोस किती निधी दिला, याबद्दल काहीच माहिती दिली गेली नाही. गेल्यावेळेस आमच्या अर्थसंकल्पात ज्या गोष्टी होत्या, त्यातील अनेक गोष्टी यांनी रिपीट केल्या आहेत. १ एप्रिलला जनतेला मोठा झटका बसणार. ३०-३५ टक्के विज दरवाढ होणार. त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं नाही, पण नंतर सांगतील. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करण्यापेक्षा त्यांच्या पिकांना योग्य भाव द्या. महिलांबाबात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण घोषणा झाली नाही. फक्त भरिव तरतूद करणार असं म्हणतात, पण भरिव म्हणजे किती करणार स्पष्ट करा,' असंही अजित पवार म्हणाले. 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना-

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता १२००० रुपयांचा सन्माननिधी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष ६००० रुपये राज्य सरकार देणार, केंद्राचे ६००० आणि राज्याचे ६००० असे १२००० रुपये प्रतिवर्ष मिळणार, ६९०० कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ १ रुपयांत पीकविमा- 

आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेण्यात येत होती. आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता, शेतकर्‍यांना केवळ १ रुपयांत पीकविमा, ३३१२ कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये त्यामुळे आता ५ लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार,  नवीन २०० रुग्णालयांचा यात समावेश करणार, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ २.५० लाखांहून ४ लाखांपर्यंत, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निर्माण करणार

Web Title: Maharashtra Budget 2023: Ajit Pawar claimed that the budget was merely announced as there was a fear that the government would collapse on March 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.