Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार चाललेय, लाखांचा पोशिंदा संपतोय; अजित पवारांनी सरकारला घेरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:59 AM2023-03-09T11:59:08+5:302023-03-09T12:03:08+5:30

Maharashtra Budget 2023: राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे, दोन दिवसापूर्वी राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केले.

Maharashtra Budget 2023: Ajit Pawar criticized the Shinde-Fadnavis government due to the loss of farmers due to unseasonal rains | Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार चाललेय, लाखांचा पोशिंदा संपतोय; अजित पवारांनी सरकारला घेरले

Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांच्या जीवावर सरकार चाललेय, लाखांचा पोशिंदा संपतोय; अजित पवारांनी सरकारला घेरले

googlenewsNext

मुंबई  - राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे, दोन दिवसापूर्वी राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले. यावरुन आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सरकारला घेरले. शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानावरुन विरोधी पक्षांनी सरकारवर टीका सुरू केल्या आहेत. आज अजित पवार यांनीही सरकारला घेरले.  

'शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालले आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने सभागृहात मांडला मात्र तो नाकारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. 

महिला दिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती मात्र ती केलीच नाही यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Budget 2023)

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चालले आहे. शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांना केला.

Sanjay Raut: ...यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडतेय; संजय राऊतांनी केले भाजपच्या टाळीवरही भाष्य

दरम्यान, विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष चर्चा करायला तयार नसल्याने महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Maharashtra Budget 2023: Ajit Pawar criticized the Shinde-Fadnavis government due to the loss of farmers due to unseasonal rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.