Maharashtra Budget Session: फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली!

By मुकेश चव्हाण | Published: March 3, 2023 04:41 PM2023-03-03T16:41:45+5:302023-03-03T16:52:55+5:30

Maharashtra Budget Session: एकनाथ शिंदेंच्या या विधानावरुन सभागृहात एकच हशा पिकला. 

Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde taunted Leader of Opposition Ajit Pawar in his speech at the convention. | Maharashtra Budget Session: फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली!

Maharashtra Budget Session: फडणवीसांनी अजितदादांना 'सहशिवसेनाप्रमुख' पद सुचवलं; शिंदे म्हणाले, आता ती पण संधी गेली!

googlenewsNext

मुंबई: सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली भूमिका मांडली. एकनाथ शिंदे भाषण करत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना जोरदार टोलेबाजी लगावली. 

अजित पवार शिवसेनेचे प्रवक्ते झाले आहेत. त्यांना आता पद द्यायचं बाकी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावर 'सहशिवसेनाप्रमुख' असं देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पद सुचवलं. मात्र एकनाथ शिंदे म्हणाले, आता ते शिवसेनाप्रमुख नाही होऊ शकत, कारण शिवसेना आपल्याकडे आहे. अजित पवारांची ती पण संधी गेली, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. 

'देवेंद्र फडणवीसांनी मला अर्धंच सांगितलंय', शिंदेंनी पुन्हा तो मुद्दा काढला; सभागृहात पिकला हशा!

एकनाथ शिंदेंनी सभागृहात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, अजित पवार मला एकदा असं बोलत होते की, एकनाथराव तुम्ही अमुक..अमुक माणसाला भेटलात का?, पण काहीजणांनी निर्णय घेतला आधी राणे वैगरे..त्यांचा प्रॉब्लेम झाला. शिवसैनिक खूप आक्रमक असतात. पण मी असं कोणालाच भेटलो नाही, असं मी अजित पवारांना म्हणाले. मी त्यांना बोलणार होते, शिवसैनिक आक्रमक असतात, शिवसेना लढाऊ असते, तो मीच आहे. पण त्यावेळी मी काहीच सांगितलं नाही. कारण मी त्यावेळी हे बोललो असतो तर अजित पवारांनी अगोदर जाऊन गडबड केली असती, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या या विधानावरुन सभागृहात एकच हशा पिकला. 

दरम्यान, एकनाथ शिंदे म्हणाले की, पहाटेचा शपथविधी म्हणजे मोठा शॉक होता. त्यात घटनेच्या खोलात मी जात नाही. मात्र या शपथविधीच्या काही सुरस कथा आहेत, त्या हळूहळू बाहेर येताय. दोन-चार मला देवेंद्र फडणवीसांनी देखील सांगितल्या. परंतु सगळ्या सांगितल्या नाही. तसेच एकनाथ शिंदे भाषण करताना बाजूला बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना म्हणाले की, तुम्ही मला अर्धच सांगितलं आहे, पूर्ण सांगितलेलं नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले इकडे सर्व सांगू नका...देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर लगेच अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस कधीच पूर्ण सांगू शकत नाही. यावर सभागृहात एकच हशा पिकला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Maharashtra Budget Session: CM Eknath Shinde taunted Leader of Opposition Ajit Pawar in his speech at the convention.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.