२६ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू; 'या' दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 05:48 PM2024-02-08T17:48:00+5:302024-02-08T17:48:53+5:30
राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
मुंबई- राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सामील झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, अजित पवार हेच अर्थमंत्री असल्यामुळे तेच हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान, अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तसेच हा अर्थसंकल्प अजित पवार मांडणार आहेत. दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले आहे. तर देशात काही दिवसातच लोकसभेच्या निवडणूका सुरू होणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी या अधिवेशनात काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शिंदे-फडणवीस-पवार सरकारला घेरण्याची जोरदार तयारी सुरू आहे.