Maharashtra CM: 'अजितदादांसोबत शपथविधीला गेलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी सांगितली 'राज(भवन) की बात'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:34 PM2019-11-23T13:34:52+5:302019-11-23T13:36:29+5:30
Maharashtra News: यावेळी पत्रकार परिषदेत जे आमदार शपथविधीला उपस्थित होते त्यातील आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेबाबत मोठी उलथापालथ राज्यातील राजकारणात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शपथविधी होत असताना राष्ट्रवादीचे १०-१२ आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र या आमदारांना कोणतीही कल्पना न देता त्यांना राजभवनावर नेण्यात आलं होतं अशी माहिती शरद पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत जे आमदार शपथविधीला उपस्थित होते त्यातील आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना बुलडाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, आम्हाला ७ वाजता फोन आला, मी अजितदादांच्या बंगल्यावर गेलो, ८-१० आमदार त्याठिकाणी जमा होते. तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं. राज्यपाल निवासस्थानी जाताना आम्हाला काहीच कल्पना देण्यात आली नाही. तेवढ्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आले. राज्यपाल उपस्थित झाले अन् धक्कादायकपणे शपथविधी झाला. शपथविधी झाल्यानंतर आम्ही ताबडतोब शरद पवारांच्या निवासस्थानी गेलो, त्यांना घडलेला घटनाक्रम सांगितला, आम्ही राष्ट्रवादीसोबतच आहोत. आम्हाला अज्ञात ठेऊन हे सगळं करण्यात आलं असा आरोप त्यांनी केला. तसेच अजितदादांनी फोन केला, राजभवनात जाईपर्यंत आम्हाला काहीही कल्पना दिली नाही, यानंतर आम्ही शरद पवारांसोबत आहोत असं बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
Two more NCP MLAs Sandip Kshirsagar and Sunil Bhusara also allege that they were unknowingly taken to the oath ceremony and that now they have come back and expressed support to Sharad Pawar. https://t.co/sLx19ngw2wpic.twitter.com/CechUAcQW4
— ANI (@ANI) November 23, 2019
तसेच विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांनी सांगितले की, आम्हाला काहीही कल्पना नव्हती, अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्हाला धक्का बसला अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
दरम्यान, प्रत्येक पक्षाने निर्वाचित आमदारांची सही घेऊन त्यांची यादी गटनेत्यांकडे ठेवल्या होत्या. यातील यादी विधिमंडळ नेते म्हणून अजित पवारांनी यादी घेतली. यातील २ यादी कार्यालयातून घेऊन अजित पवार कदाचित भाजपाला पाठिंबा देण्यासाठी गेले असावेत, ५४ आमदारांचा पाठिंबा आहे असं भासविण्यात आलं. राज्यपालांचीही फसवणूक झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
त्याचसोबत भाजपाला बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यानंतर आम्ही तीन पक्ष मिळून बहुमत सिद्ध करु, शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल, आम्ही सगळे एकत्र आहोत, एकत्र राहणार, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ४ वाजता होणार आहे. त्यात नवीन विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहे असं शरद पवारांनी सांगितले.