Maharashtra CM: 'आम्ही १६२', या आणि पाहा... संध्याकाळी ७ वाजता महाविकासआघाडीची 'परेड'; राज्यपालांनाही आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 05:18 PM2019-11-25T17:18:11+5:302019-11-25T17:19:10+5:30

Maharashtra News: 'शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन करणार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

Maharashtra CM: 'We are 162', come and watch... The 'parade of NCP-Shiv Sena-Congress' MLA at 7 pm; An invitation to the governor too | Maharashtra CM: 'आम्ही १६२', या आणि पाहा... संध्याकाळी ७ वाजता महाविकासआघाडीची 'परेड'; राज्यपालांनाही आमंत्रण

Maharashtra CM: 'आम्ही १६२', या आणि पाहा... संध्याकाळी ७ वाजता महाविकासआघाडीची 'परेड'; राज्यपालांनाही आमंत्रण

Next

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेमध्ये भाजपाने सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथही घेतली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्तास्थापन करण्यापूर्वीच अजित पवारांच्या मदतीने भाजपाने सरकार स्थापन केले. मात्र भाजपा सरकारकडे बहुमत नसताना त्यांनी सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. 

याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यपालांना महाविकासआघाडीकडे बहुमत असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी तुम्ही या आणि पाहा असं आवाहनदेखील करण्यात आलं आहे. 'शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन करणार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हाँटेल मधील मुख्य हॉलमध्ये हे सर्व आमदार एकत्र जमणार आहेत. यावेळी महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

भाजपा सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेनं याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी झाली असता उद्या कोर्ट त्यावर निर्णय देणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचं पत्र देऊन अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे ते पत्र ग्राह्य धरू नये, अशी मागणी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी केली आहे. आमच्याकडे 162 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधीमंडळ नेते जयंत पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र दिलेलं आहे.

यावेळी महाराष्ट्रात राज्यपालांच्या समोर आमच्या 162 आमदारांचं समर्थन सिद्ध करू. राज्यपालांसमोर आमची परेड करण्याची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह अपक्षांच्या सह्यांची यादी सोबत जोडलेली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे 162 हे पुरेसं संख्याबळ आहे. बहुमताला 145 आमदारांची गरज आहे. त्यामुळे तात्काळ आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्यात यावं, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. 

महत्वाच्या बातम्या 

छाती फोडली तर शरद पवारच दिसतील; 'त्या' आमदाराने सांगितली 'अपहरणा'ची आपबिती

संजय राऊतांना वेड्याच्या इस्पितळात भरती करा, दानवेंची जहरी टीका

'...त्यापेक्षा स्फोटकं आणून सगळ्यांना एकाच झटक्यात मारून टाका'; सुप्रीम कोर्टाचा संताप

भाजपासोबत जाण्याचं राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं; अजितदादांनी केले अनेक गौप्यस्फोट, म्हणाले...

'शेतकऱ्याच्या एकाच मुलाने शेती करावी अन् दुसऱ्यानं उद्योग-धंदा'

Web Title: Maharashtra CM: 'We are 162', come and watch... The 'parade of NCP-Shiv Sena-Congress' MLA at 7 pm; An invitation to the governor too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.