Ajit Pawar: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लॉकडाऊनचा विचार सुरू; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 12:34 PM2021-02-18T12:34:38+5:302021-02-18T12:35:13+5:30

Ajit Pawar On Lockdown: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे

maharashtra deputy CM Ajit Pawar on lockdown In State corona cases increasing | Ajit Pawar: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लॉकडाऊनचा विचार सुरू; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

Ajit Pawar: कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, लॉकडाऊनचा विचार सुरू; अजित पवार यांचे स्पष्ट संकेत

googlenewsNext

राज्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचं प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेतले जातील असं सांगत लॉकडाऊन करायचा की नाही? याबाबत विचार सुरू असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Deputy CM Ajit Pawar On Lockdown In State)

कोरोनाचा उद्रेक! सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलचं दार पुन्हा होणार बंद?; रेल्वेकडून स्पष्टीकरण

"राज्यात जानेवारीच्या अखेरीस कोरोना परिस्थिती नियंत्रणात होती. पण फेब्रुवारीत रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. लोक मास्क वापरत नाहीत. प्रतिबंधक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे आता कठोर निर्णय घ्यावेच लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईपेक्षा अमरावती, यवतमाळमध्ये रुग्ण संख्या जास्त वाढताना दिसतेय. यामुळे फक्त शहरांमध्ये की ग्रामीण भागातही लॉकडाऊन लावायचा याबाबत विचार सुरू आहे. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक आहे. यात कोरोना रुग्णवाढीवर सविस्तर चर्चा होणार आहे", असं अजित पवार म्हणाले. 

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

राज्यात रुग्ण वाढू नयेत म्हणून खबरदारी
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून जी खबरदारी आणि जे निर्णय घेण्याची गरज वाटेल मग ते कितीही कठोर निर्णय असले तरी ते घेतले जातील, असं स्पष्ट करत अजित पवार यांनी लॉकडाउनचे संकेत दिले आहेत. याशिवाय अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले. अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोरोना रुग्णवाढीचं प्रमाण वाढलेलं दिसतंय त्यामुळे या भागांसाठी कडक निर्बंध लागू केले जाण्याची दाट शक्यता आहे. 

संजय राठोडांशी फोनवर चर्चा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्याच्या राजकारणात जोरदार वादळ उठलेलं असताना वनमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे संजय राठोड गायब आहेत. याबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं असता संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. "संजय राठोड हे माझ्या संपर्कात आहेत. यवतमाळमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये संदर्भात माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासोबत अकोला आणि अमरावतीच्याही संबंधित पालकमंत्र्यांशी माझं बोलणं झालं आहे", असं अजित पवार म्हणाले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी पोलीस याबाबत संपूर्ण चौकशी करत आहेत. त्यांना त्यांचं काम करु द्यात. सत्य काय आहे ते सर्वांसमोर येईलच, असं अजित पवार म्हणाले. 

Web Title: maharashtra deputy CM Ajit Pawar on lockdown In State corona cases increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.