Maharashtra Election 2019: 'भाजपाचे शिवसेनेवर प्रचंड मानसिक अत्याचार; त्यांना उपचारांची गरज'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 09:27 PM2019-10-08T21:27:38+5:302019-10-08T21:43:58+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला राज्यात सुरुवात झाली असून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहे.
मुंबई - भाजपने शिवसेनेवर प्रचंड मानसिक अत्याचार केले आहेत. जी कमळाबाई पायाजवळ होती ती कमळाभाई होऊन डोक्यावर नाचते, इडीची भीती दाखवते. म्हणूनच असंबद्ध बडबड, पोकळ विरोध, मुख्यमंत्रीपदाची दिवास्वप्ने व लोटांगण असा विरोधाभास दिसतो. शिवसेनेला उपचारांची गरज आहे, तिरस्कार करु नका असं आवाहन काँग्रेसने जनतेला करत शिवसेनेला चिमटा काढलेला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला राज्यात सुरुवात झाली असून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहे. गेली चार वर्षे सत्तेत एकत्र राहून शिवसेना-भाजपाने एकमेकांवर चिखलफेक केली. असं असतानाही निवडणुकीच्या तोंडावर सत्तेसाठी पुन्हा शिवसेना-भाजपाची युती झाली. या मुद्दयावरुन काँग्रेसने शिवसेनेला टोला लगावला आहे.
जनतेला आवाहन-
— Sachin Sawant (@sachin_inc) October 8, 2019
भाजपने शिवसेनेवर प्रचंड मानसिक अत्याचार केले आहेत. जी कमळाबाई पायाजवळ होती ती कमळाभाई होऊन डोक्यावर नाचते, इडीची भीती दाखवते. म्हणूनच असंबद्ध बडबड, पोकळ विरोध, मुख्यमंत्रीपदाची दिवास्वप्ने व लोटांगण असा विरोधाभास दिसतो. शिवसेनेला उपचारांची गरज आहे, तिरस्कार करु नका
तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत, त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येऊ शकतात. यावर उद्धव ठाकरेंनी आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी आता थकू नका ताजेतवाने राहा असं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
तर दसरा मेळाव्याचं भाषण ऐकून काँग्रेसने शिवसैनिकांची आम्हाला दया येते. प्रत्येक वेळी नवीन अभ्यासक्रम, नवीन नियम, नवीन धडे शिकावे लागतात. दुर्दैव म्हणजे शिक्षकालाही ते समजले नसतात. म्हणूनच शिवसैनिक आजवर म्हणत आला आहे- बाकी काय आपल्याला कळत नाही, आदेश काय ते सांगा असं सांगत पुन्हा चिमटा काढला
काठी , घोंगडं, काठी तलवार, नाताळाच्या माथी हाणू काठी , पण मी नाठाळ नाही, राम मंदिर , ३७० हाती घेतले, तडीस यांनी नेले, युती केली, कारण जे आहे ते, पाटील म्हणाले नाईलाज आहे- मग केली रोखठोक, ढाल , तलवार, वाघनखं, कोथळा इत्यादी इत्यादी
— Sachin Sawant (@sachin_inc) October 8, 2019
डोकं गरगरलं! प्रतिक्रिया - काय देणार, कपाळ?🤣🤣