महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही; काँग्रेसचे 'शिव'संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 03:44 PM2019-11-06T15:44:22+5:302019-11-06T15:44:35+5:30

राज्यात निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 13 दिवस उलटले तरी सत्ता स्थापन झालेलं आहे.

maharashtra election 2019 - BJP will not be the Chief Minister of the state; Husain Dalwai | महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही; काँग्रेसचे 'शिव'संकेत

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यात भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही; काँग्रेसचे 'शिव'संकेत

Next

मुंबईः राज्यात निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 13 दिवस उलटले तरी सत्ता स्थापन झालेलं आहे. शिवसेना-भाजपामध्ये सत्तावाटपावरून चढाओढ सुरू असून, दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्यात येत आहेत. शिवसेनेनं अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी लावून धरली असून, भाजपा त्यांना सत्तेत झुकतं माप देण्यास तयार नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती. जवळपास 10 मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. नेहमीप्रमाणे ही सदिच्छा भेट होती, असं संजय राऊत यांनी सांगितले.

आता काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी संजय राऊतांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला.  कोणत्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू देणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपापेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो. भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये बराच फरक आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला आहे.  

हुसेन दलवाई सामना कार्यालयात संजय राऊतांच्या भेटीसाठी आल्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. काँग्रेसचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी राज्यातील परिस्थिती सोनिया गांधींना सांगितली. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल सोनिया यांनी फारशी अनुकूलता न दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रात भाजपा सत्तेपासून दूर होईल. मात्र याचे परिणाम राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसला सहन करावे लागतील, अशी भूमिका सोनिया यांनी मांडल्याचं समजतं. त्यामुळे राऊत-शरद पवार यांच्या भेटीत पवारांनी विरोधी पक्षात बसण्याचं व्यक्त केलेले मतं शिवसेनेच्या प्रयत्नांना ब्रेक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे

Web Title: maharashtra election 2019 - BJP will not be the Chief Minister of the state; Husain Dalwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.