Maharashtra Election 2019 : बोरीवलीमध्ये काँग्रेस उमेदवाराचे बंड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 03:34 AM2019-10-05T03:34:11+5:302019-10-05T03:34:28+5:30
उत्तर मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवा शेट्टी यांनी बंडखोरी केली
मुंबई: उत्तर मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवा शेट्टी यांनी बंडखोरी केली असून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज शुक्रवारी सादर केला आहे. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसचे शिवा शेट्टी इच्छुक उमेदवार होते़ त्यांनाच उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कुमार खिल्लारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारीसाठी इच्छुक शिवा शेट्टी यांनी बंडाचे शस्त्र उगारत अखेर शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला.
बोरीवली मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाल्याने भाजपचे पदाधिकारी यांना टेन्शन नसले तरी या मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने शिवानंद शेट्टी अर्थात शिवा शेट्टी हे सुरुवातीपासून इच्छुक उमेदवार होते. शिवा शेट्टी हे मागील निवडणुकीपासून इच्छुक असून लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारात बºयापैकी पुढाकार घेतला होता. पक्षातील अंतर्गत आणि जातीचे राजकारण यामुळे उमेदवारी डावलली गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. पक्षाने त्यांची विभागातील कामे आणि जनसंपर्क न पाहता, कोणताही जनसंपर्क नसलेल्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याने ते नाराज झाले. पक्षपातीपणा झाल्याने आपण अपक्ष म्हणून अर्ज सादर केल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.