महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 05:29 PM2019-10-21T17:29:52+5:302019-10-21T17:37:46+5:30
महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान पार पडत आहे. अनेक ठिकाणी दिग्गज नेते, कलाकार मंडळी मतदानाचा हक्क बजावित आहे. काही भागात ईव्हीएमबाबतच्या तक्रारी येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.
अचलपूर - १, ऐरोली - १, अकोला पूर्व - १, अकोला पश्चिम -६, अकोट -३, आंबेगाव - १, अमरावती -४, अंधेरी पश्चिम -१, अणुशक्तीनगर - १, औरंगाबाद -१३, औसा - १, बाळापूर - ३, भोकर - ५, बोरिवली - १, बुलढाणा - २, भायखळा - १, चांदिवली - ३, चंद्रपूर - ४, चिखली - १, चिमूर -१, चोपडा -१, कुलाबा -१, धुळे शहर - १, दिंडोशी -३, गडचिरोली - १, घाटकोपर - २, गोरेगाव - २, कोल्हापूर उत्तर - ६, कोल्हापूर दक्षिण -२, कर्जत जामखेड - ३, जालना -४, हिंगणघाट -२, जामनेर -१, जोगेश्वरी पूर्व - २, कराड उत्तर - १, कसबा पेठ - २, करवीर -१, खामगाव -२, किणवट -१, कोपरी पाचपाखाडी -१, कुर्ला १ अशा प्रकारे राज्यभरात ईव्हीएमबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत.
तसेच पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय. मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाने यापूर्वीच वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. मतदान करताना मोबाईल जवळ बाळगण्यासदेखील बंदी घातली आहे. परंतु असे असूनही काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये आपण मतदान करतानाचे हे व्हिडिओ शूट करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
अनेक मतदान केंद्रांवर पोलिसांनीही मोबाईल बंदी घातली आहे. परंतु काही अति उत्साही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून मोबाईल मतदान केंद्राच्या आत घेऊन जात आहेत. यातून या मोबाईल बंदीचा फारसा फायदा झाला नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.