Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:52 PM2019-10-07T15:52:57+5:302019-10-07T15:54:07+5:30

सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी करण्याची घोषणा

Maharashtra Election 2019: Congress, NCP's ShapathNama published; Great promise for the unemployed and the workers | Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

Maharashtra Election 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीचा शपथनामा प्रकाशित; बेरोजगार अन् कामगारांसाठी दिलं मोठं आश्वासन 

Next

मुंबई : पुरोगामी लोकशाही महाआघाडीचा शपथनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नबाब मलिक, एकनाथ गायकवाड, सचिन सावंत, अनिल गोटे (लोकसंग्राम पक्ष धुळे शहरातुन लढणार), बीआरएसपी, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शपथनाम्यातील ठळक मुद्दे 

  • शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफीची घोषणा झाली प्रत्यक्षात फसवणूक आम्ही अंमलबजावणी करू. 
  • बेरोजगारांना पाच हजारांचा मासिक भत्ता
  • केजी टू पीजी मोफत शिक्षण 
  • शैक्षणिक कर्ज शुन्य टक्के
  • आरोग्य विमा कवच
  • कामगारांसाठी २१००० किमान वेतन
  • मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठ
  • सर्वच महापालिकांमध्ये ५०० फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफी.
  • ८० टक्के नोकरी स्थानिकांना 

 

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पाच वर्षात युती सरकारने राज्याला अधोगतीकडे नेले. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारीचा वाढली, अर्थव्यवस्था घसरली आहे. १३ टक्केवरून १०.४ वर आली. जात पडताळणी प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक करणार असून महिला बचतगटांना २००० कोटींचा व्यवसाय उपलब्ध करून देणार आहे. सच्चर समितीच्या शंभर टक्के अंमलबजावणीचे आश्वासन देत शहरीकरणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: Congress, NCP's ShapathNama published; Great promise for the unemployed and the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.