Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:46 AM2019-11-16T04:46:15+5:302019-11-16T04:46:49+5:30

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांनी बंद दाराआड खातेवाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली

Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena unanimously agree on allocation of accounts? | Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

Next

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांनी बंद दाराआड खातेवाटपावर प्राथमिक चर्चा पूर्ण केली असून महसूल, गृह आणि नगर विकास हे तीन महत्वाचे विभाग तीनही पक्षांमध्ये विभागून घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहील, तर उपमुख्यमंत्रीपदाचा निर्णय आघाडीचे नेते घेणार आहेत.
खाते वाटपासाठी वित्त व नियोजन, सार्वजनिक बांधकाम आणि उर्जा यांचा एक गट, कृषी, सहकार आणि ग्रामविकास यांचा एक गट, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, आणि उच्च व तंत्रशिक्षण असा एक गट करण्यात आला असून ही खाती तीन पक्षांमध्ये विभागली जातील. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, शिवसेनेसोबत दोन्ही काँग्रेसची चर्चा सतत होत आहे. आमचे नेते एकमेकांना भेटत आहेत. त्यातूनच आम्ही समान कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे चौघेही शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या बाजूने पूर्णपणे अनुकूल आहेत. तर काँग्रेसच्या तब्बल ३९ आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला भाजपचे सरकार नको आहे अशी भूमिका घेतली आहे.
काँग्रेस आमदारांचा दबाव
काँग्रेसच्या काही आमदारांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची शुक्रवारी भेट घेतली. जर तुम्ही सत्तेत सहभागी होणार नसाल तर आम्हाला आमचे मार्ग मोकळे आहेत, असा इशारा दिल्याचे समजते. माणिकराव ठाकरे, नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार हे तीनही विदर्भातील नेते देखील आता सरकारमध्ये सहभागी होण्याच्या तयारीत आले आहेत. भाजप जर सत्तेवर आली तर आम्हाला पुढची पाच वर्षे विरोधात टिकून रहाणे अत्यंत कठीण होईल, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे.
>‘रविवारी होईल सगळे चित्र स्पष्ट’
रविवारी पक्षाचे नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आधी बैठक होईल. त्यानंतर पवार हे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील आणि त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.
- बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena unanimously agree on allocation of accounts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.