Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 10:55 AM2019-08-14T10:55:36+5:302019-08-14T11:27:55+5:30

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता रितेश देशमुख, सुबोध भावे यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचे मदतीचे हात पुढे येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर सरसावल्या आहेत.

Maharashtra Flood Urmila Matondkar help flood victims in maharashtra | Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

Next
ठळक मुद्देपूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या आहेत. कोल्हापूर मिरज, इचलकरंजीच्या दौऱ्यावर तेथील छावण्यांना भेट देऊन जीवनावश्यक गोष्टींची मदत केली जाईल. उर्मिला मातोंडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदत

मनोहर कुंभेजकर

मुंबई - पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता रितेश देशमुख, सुबोध भावे यांच्यासह अनेक सेलिब्रिटीचे मदतीचे हात पुढे येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री व काँग्रेसच्या नेत्या उर्मिला मातोंडकर सरसावल्या आहेत. उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तुकडीसह बुधवारी पहाटे मिरज-इचलकरंजी-कोल्हापूरच्या दोन दिवसांच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उर्मिला मातोंडकर रवाना झाल्या. मुंबई काँग्रेसचे सचिव व प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

उर्मिला मातोंडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून कोल्हापूर मिरज, इचलकरंजीच्या दौऱ्यावर तेथील छावण्यांना भेट देऊन जीवनावश्यक गोष्टींची मदत केली जाईल. यावेळी त्यांच्या समवेत धनंजय जुन्नरकर, चौथी प्रसाद गुप्ता, राम चौहान, शिवानंद शर्मा, कालिका यादव, उबेद खान, सतीश रणदिवे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते असणार आहेत. 

उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मिरज -इचलकरंजी- कोल्हापूर येथील पूरग्रस्त विभागाला, छावण्यांना भेट देणार आहेत. बुधवारी आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पहाटे 4 वाजता त्या मिरजकडे रवाना झाल्या. मुंबई-मिरज हा 415 किमीचा टप्पा पूर्ण करणार आहे. आज दुपारी 3 वाजता त्यांचे मिरज शहरात आगमन होईल. त्यानंतर दुपारी 3 ते 4 छावणी भेट तर दुपारी 4 वाजता त्या मिरजहून 35 किमीचे अंतर पार करत इचलकरंजीला 5 वाजता पोहचतील. त्यानंतर  सायंकाळी 5 ते 6.30 इचलकरंजी येथे छावणी भेट देणार आहेत. 6.30 वाजता इचलकरंजीहून कोल्हापूर येथे जाणार असून सायंकाळी 7.30 वाजता कोल्हापूर येथे त्यांचे आगमन होईल. तसेच कोल्हापूर च्या जागृत महालक्ष्मी मंदिर देवस्थानला त्या भेट देणार आहेत. 8.15 ते 9.30 कोल्हापूर छावणीला भेट आणि रात्री कोल्हापूर येथे मुक्काम असा कार्यक्रम आहे.

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, तेल, डाळी, चहा पावडर 1/4 (पावशेर), साखर 2 किलो साखर, अंगाचा साबण 1, पेस्ट, हळद, मेणबत्ती तसेच बिस्कीट पुडे, चादर, महिलांना सॅनेटरी पॅड आदींचा एकत्रित संच देणार असल्याची माहिती धनंजय जुन्नरकर यांनी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी झेंडावंदन करून सुमारे 8 तासांच्या 375 किमीचा कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करून उद्या काँग्रेस कार्यकर्त्यांसह त्या मुंबईला पोहचतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

 

Web Title: Maharashtra Flood Urmila Matondkar help flood victims in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.