Maharashtra Floor Test LIVE: उद्धव ठाकरे सरकारने बहुमताचा ठराव जिंकला, १६९ आमदारांचा पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:09 PM2019-11-30T13:09:49+5:302019-11-30T15:10:09+5:30
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार आहे. दुपारी २ च्या सुमारास विधानसभेत बहुमत ठराव मांडण्यात येत येईल. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील सभागृहाचं कामकाज सांभाळतील. तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले आणि भाजपाकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी १४५ आमदारांचा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. मात्र १७० पेक्षा अधिक आमदार महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करतील असा दावा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
- उद्धव ठाकरे सरकारने बहुमत ठराव जिंकला, १६९ आमदारांचा सरकारच्या बाजूने मतदान, ४ आमदार तटस्थ तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शून्य मतदान
Total votes in favour of #MahaVikasAghadi Government are 169. https://t.co/4COWoHgoq3
— ANI (@ANI) November 30, 2019
- मंत्रिपदाची शपथ ही सभागृहातील घटना नाही, याचा अधिकार राज्यपालांना, मंत्रिमंडळाला हंगामी अध्यक्ष बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो. राज्यपालांनी केलेली निवड यामुळे सभागृह चालविण्याचा अधिकार मला प्राप्त झाला आहे - दिलीप वळसे पाटील
- सगळे नियम, कामकाज धाब्यावर बसवून सभागृहाचं कामकाज सुरु आहे, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह सुरु आहे - फडणवीस
- देशाच्या इतिहासात कधीही हंगामी अध्यक्ष अधिवेशन सुरु असताना बदलला नाही, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाल्याशिवाय आजतागायत विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही अशी विधानसभेची प्रथा-परंपरा आहे, बहुमत असताना का निवडणूक घेतली नाही? - फडणवीस
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करुन दिला नव्या मंत्र्यांचा परिचय
- भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ, आमदारांकडून घोषणाबाजी
- आजचं अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, ७ दिवसांत अधिवेशन पुन्हा घेता येतं. हंगामी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळले फडणवीस यांचा दावा
- रात्री उशिरा आम्हाला कळविले जाते अधिवेशन आहे, बहुमत आहे तर अधिवेशन इतक्या उशिरा बोलविण्याची गरज का पडली? आमचे आमदार उपस्थित राहू नये म्हणून हे केलं का? - फडणवीस
BJP's Devendra Fadnavis in state assembly: This assembly session is not per rules.This session started without Vande Mataram, it is a violation of rule. #Maharashtrapic.twitter.com/QWXAB4F3rQ
— ANI (@ANI) November 30, 2019
- अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, अधिवेशन बोलविण्यासाठी राज्यपालांनी समन्स गरजेचे
- महाविकास आघाडीकडून १७० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा, आणखी आमदार सरकारसोबत येतील - भास्कर जाधव, आमदार, शिवसेना
- बहुमत चाचणीपूर्वी शिवसेना नेत्यांसह आमदारांनी बांधले फेटे
- शिवसेना नेते संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल
- शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसने आमदारांना बजावले व्हीप, कामकाजात सहभागी होऊन मतदान करण्याचे आदेश
Congress issues three line whip to its MLAs directing them to remain present in the Assembly ahead of floor test, today. #Maharashtrapic.twitter.com/dn8VzeIBMO
— ANI (@ANI) November 30, 2019
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात दाखल