Maharashtra Government: सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, दिग्दर्शक कोण लवकरच कळेल; संजय राऊतांचा नवा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:15 PM2019-11-26T19:15:26+5:302019-11-26T19:25:12+5:30

या सर्व नाट्यमय घडामोडीत अजित पवारांच्या साथीने भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला.

Maharashtra Government: 'Everything is as it was intended; Who will soon know the director Says Sanjay Raut | Maharashtra Government: सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, दिग्दर्शक कोण लवकरच कळेल; संजय राऊतांचा नवा ट्विस्ट

Maharashtra Government: सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, दिग्दर्शक कोण लवकरच कळेल; संजय राऊतांचा नवा ट्विस्ट

googlenewsNext

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यात अवघ्या साडेतीन दिवसात भाजपाचं सरकार कोसळलं आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे बहुमताचा आकडा नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यापालांकडे राजीनामा सोपाविला. गेल्या ४ दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तानाट्यात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक उलथापालथ पाहायला मिळाली. मात्र याबाबत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. सगळं ठरल्याप्रमाणेच झालंय, अनेक गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या असं सांगत मोठा ट्विस्ट आणला आहे. 

२२ नोव्हेंबरच्या रातोरात राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घातली. अजित पवारांच्या या खेळीमुळे अवघ्या महाराष्ट्रात भूकंप झाला होता. शरद पवारांनी याबाबत खुलासा केला, अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय नाही असं सांगितले. त्यानंतर अजित पवारांनीही मी अजून राष्ट्रवादीत आहेत. राष्ट्रवादी सोडणार नाही, शरद पवार हेच आमचे नेते आहेत असं सांगून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केला. 

या सर्व नाट्यमय घडामोडीत अजित पवारांच्या साथीने भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. आमच्याकडे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचं भाजपा नेते सांगत होते. २२ नोव्हेंबरच्या रात्री अचानक घडलेल्या घडामोडीत राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात येत भाजपा सरकार स्थापन झालं. या सर्व घडामोडी कायद्याच्या चौकटीत घडल्या नाहीत असं सांगत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी अनेक दावे-प्रतिदावे केले गेले, अखेर आज सुप्रीम कोर्टाने उद्या बहुमत सिद्ध करा असे आदेश सरकारला दिले होते. त्यानंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत आहे असं सांगितले. त्यामुळे भाजपा सरकार अल्पमतात आलं. सरकार कोसळलं.

गेल्या ४ दिवसांचे आमदारांचं बेपत्ता प्रकरण, भाजपाकडून ऑपरेशन लोटस, आमदारांच्या फोडाफोडी या सर्व घटनांनी प्रत्येक मिनिटाला उत्कंठा वाढवून ठेवली होती. मात्र या सर्व घडामोडीमध्ये भाजपाची नाचक्की झाली. अजित पवारांनासोबत घेऊन सरकार स्थापन केल्याने भाजपाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अखेर महाशिवआघाडीचं सरकार राज्यात स्थापन होण्यास मदत झाली. या सर्व नाट्यमय राजकीय घडामोडीत संजय राऊतांनी पुन्हा एकदा सांगितले की, शरद पवारांना समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील, सगळं ठरल्याप्रमाणे झालंय, अनेक गोष्टी ठरविल्या तशा घडल्या, दिग्दर्शक लवकरच कळेल असं सांगितल्याने हे सर्व नाट्य होतं का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.   

महत्वाच्या बातम्या

अवघ्या साडेतीन दिवसात भाजपा सरकार कोसळलं; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरेच 5 वर्षांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेनं केली घोषणा

'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

'जनतेनं भगवा फडकवला, पण शिवसेनेनं तो सोनिया गांधी, शरद पवारांच्या चरणी ठेवला'

उपमुख्यमंत्रिपद सोडणारे अजित पवार राजकारणातूनही संन्यास घेणार? 
 

 

Web Title: Maharashtra Government: 'Everything is as it was intended; Who will soon know the director Says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.